Tuesday, September 17, 2024 01:11:07 AM

Panshet Dam is 95 percent full
पानशेत धरण ९५ टक्के भरलं

पुण्यातील पानशेत धरण ९५ टक्के भरलं आहे. पानशेत धरणाच्या वांजळवाडी सांडव्यातुन ४ हजार ४८० क्सुसेक वेगाने पाण्याचा विसर्ग मुठा नदीपात्रात सुरू केलेला आहे.

पानशेत धरण ९५ टक्के भरलं
PANSHET DAM

२८ जुलै, २०२४, पुणे : पुण्यातील पानशेत धरण ९५ टक्के भरलं आहे. पानशेत धरणाच्या वांजळवाडी सांडव्यातुन ४ हजार ४८० क्सुसेक वेगाने पाण्याचा विसर्ग मुठा नदीपात्रात सुरू केलेला आहे. तर, वीज निर्मिती सांडव्यातुन प्रत्येकी ६०० क्सुसेक वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. यामुळे, खडकवासला धरणाच्या पाणीसाठ्यात भर पडत असून खडकवासला धरणातून पुन्हा मुठा नदीच्या पात्रात पाणी सोडण्यात येणार आहे. त्यापार्श्वभूमीवर नदी काठच्या रहिवाशांना जलसंपदा विभागाकडून सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. पुण्याच्या घाटमाथ्यावर पावसाची संततधार सुरू असल्याने खडकवासला धरण साखळीतील चारही धरणांत झपाट्याने वाढ होत आहे. 


 


सम्बन्धित सामग्री