Sunday, September 29, 2024 12:56:47 AM

nutrition workers protest
वेतनवाढीसाठी पोषणआहार कर्मचारी आक्रमक

नाशिकच्या नांदगावमध्ये वेतनवाढीसाठी पोषणआहार कर्मचारी आक्रमक झाले आहेत. शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांना किमान दहा हजार वेतन द्यावे, यासह विविध प्रलंबित मागण्यासाठी पोषणआहार कर्मचारी आक्रमक झाले आहेत.

वेतनवाढीसाठी पोषणआहार कर्मचारी आक्रमक 
nsk protest

५ ऑगस्ट, २०२४, नाशिक : नाशिकच्या नांदगावमध्ये वेतनवाढीसाठी पोषणआहार कर्मचारी आक्रमक झाले आहेत. शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांना किमान दहा हजार वेतन द्यावे, चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणून सेवेत कायम करावे यासह विविध प्रलंबित मागण्यासाठी पोषणआहार कर्मचारी आक्रमक झाले आहेत. नाशिकच्या नांदगावमध्ये आधारवड संस्थेच्या नेतृत्वाखाली शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांनी मोर्चा काढत ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. नांदगाव पंचायत समितीसमोर हे आंदोलन करण्यात आले. यावेळी, आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली.पोषण आहार कर्मचाऱ्यांना १० लाखाचे विमा संरक्षण द्यावे, विनाकारण कामावरून कमी करू नये आदी आग्रही मागण्या यावेळी करण्यात आल्या. जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार आंदोलकांनी केल्याने तिढा निर्माण झाला होता.अखेर प्रशासनाने लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले आहे.
 


सम्बन्धित सामग्री