Sunday, September 08, 2024 08:42:06 AM

Marathwada
राज्यात धो-धो... मराठवाड्यात 'खो'

राज्यात पाऊस धो-धो बरसत असला, तरी मराठवाड्याला मात्र पावसाने 'खो' दिला आहे.

राज्यात धो-धो मराठवाड्यात खो

छत्रपती संभाजीनगर : राज्यात पाऊस धो-धो बरसत असला, तरी मराठवाड्याला मात्र पावसाने 'खो' दिला आहे. ८ जिल्ह्यांत आजवर वार्षिक सरासरीच्या तुलनेत ५५ दिवसांत ५५.९ टक्के पाऊस झाला आहे. वार्षिक सरासरी ६७९.५ मिमी पाऊस पडतो. त्या तुलनेत आजवर ३८०.१ मिमी पाऊस विभागात झाला आहे. परंतु, पाणलोट क्षेत्रामध्ये दमदार पाऊस न झाल्यामुळे ७४९ लहान, ११ मोठे व मध्यम ७५ मिळून ८७७ प्रकल्प अद्यापही तहानलेलेच आहेत.

मराठवाडा - जिल्हानिहाय पाऊस 

छत्रपती संभाजीनगर: ५९.२ टक्के

जालना: ५७.४ टक्के

बीड: ६६.८ टक्के

लातूर: ६१.२ टक्के

धाराशिव: ६५.५ टक्के

नांदेड: ४९.२ टक्के

परभणी: ४८.७ टक्के

हिंगोली: ४७ टक्के

एकूण: ५५.९ टक्के

पेरणी आणि प्रकल्पाची स्थिती

पूर्ण झालेल्या पेरण्या - ९८ टक्के

११ मोठ्या प्रकल्पांत जलसाठा - १७ टक्के

पावसाची स्थिती - मराठवाड्यात किती 

पाऊस: ५५.९ टक्के

वार्षिक सरासरी: ६७९.५ मिमी

जूनपासून आजवर पाऊस: ३८०.१ मि.मी

२४ जुलै रोजी सकाळपर्यंत पाऊस : १९.९ मिमी

जुलै महिन्यात पाऊस: १९६.८ मिमी


सम्बन्धित सामग्री