Monday, September 09, 2024 02:24:20 PM

c p radhakrishnan new governer of maharashtra
सी. पी. राधाकृष्णन महाराष्ट्राचे नवे राज्यपाल

झारखंडचे राज्यपाल असलेले सी. पी. राधाकृष्णन यांनी बुधवारी ३१ जुलै, २०२४ रोजी महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची शपथ घेतली. राजभवनातील दरबार हॉल येथे शपथविधी झाला.

सी पी राधाकृष्णन महाराष्ट्राचे नवे राज्यपाल 
c p radhakrishnan

३१ जुलै, २०२४, मुंबई : झारखंडचे राज्यपाल असलेले सी. पी. राधाकृष्णन यांनी बुधवारी ३१ जुलै, २०२४ रोजी महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची शपथ घेतली. राजभवनातील दरबार हॉल येथे झालेल्या शपथविधी सोहळ्यात मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांनी त्यांना राज्यपाल पदाची शपथ दिली.
शपथविधीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यपाल राधाकृष्णन यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. राधाकृष्णन हे महाराष्ट्राचे २१ वे राज्यपाल आहेत. शपथविधी सोहळ्याला उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, माजी मुख्यमंत्री नारायण राणे, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, अतिरिक्त मुख्य सचिव राजशिष्टाचार मनिषा म्हैसकर आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
सुरुवातीला मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी राधाकृष्णन यांच्या नियुक्तीसंदर्भातील राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काढलेली अधिसूचना वाचून दाखवली. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीत आणि राज्यगीताने झाली तर सांगता राष्ट्रगीताने झाली. शपथविधीनंतर राज्यपालांना भारतीय नौदलातर्फे मानवंदना देण्यात आली.


सम्बन्धित सामग्री