Sunday, April 06, 2025 06:48:24 PM

Nashik: नाशकात शिवसेनेचा वाद संपेना..

महाराष्ट्रात राजकीय वातावरण अनेक बदल घडत असतात. यातच आता नाशिकमधून शिवसेनेचा वाद चव्हाट्यावर आलाय. आधीच पालकमंत्री पदाच्या वादावरून नाशिक शहर चर्चेत आहे.

nashik नाशकात शिवसेनेचा वाद संपेना

नाशिक: महाराष्ट्रात राजकीय वातावरण अनेक बदल घडत असतात. यातच आता नाशिकमधून शिवसेनेचा वाद चव्हाट्यावर आलाय. आधीच पालकमंत्री पदाच्या वादावरून नाशिक शहर चर्चेत आहे. त्यातच आता नाशकात शिवसेनेत दोन गट पडल्याचं पाहायला मिळतंय. महानगर प्रमुख प्रवीण तिदमे आणि उपनेते अजय बोरस्ते यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद असल्याचं बोललं जातंय. दरम्यान आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची आभार सभा नाशिकमध्ये पार पडणारे. दिनांक 14 फेब्रुवारी रोजी ही सभा नाशकात पार पडणार असून आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावर काय भाष्य करणार हे पाहणं महत्वाचं ठरणारे. 

हेही वाचा: Vaibhav Naik : पत्नीसह आज नाईकांची एसीबीकडे चौकशी

अंतर्गत वादावर दादा भुसेंची प्रतिक्रिया: 

'नाशिकमध्ये शिवसेनेत गट तट नाही, कोणी कोणती जबाबदारी स्वीकारावी यासाठी कमिटी स्थापन करतोय.', असं म्हणत दादा भुसे यांनी अंतर्गत वादावर पडदा टाकला. तसंच, 'कुठलंही ऑपरेशन सांगून होत नाही. नाशिकमध्ये देखील छोटे मोठे ऑपरेशन होतील आणि या ऑपरेशनचे मुख्य डॉक्टर एकनाथ शिंदे आहेत असं म्हणत दादा भुसे यांनी पक्षात होणार्‍या आगामी इनकमिंगबद्दल माहिती दिली.

तसंच, 'विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या माध्यमातून जे भरघोस यश मिळालं. त्यासाठी जनतेचे आभार मानण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राज्यामध्ये दौरा करत कार्यकर्त्यांसोबत जनेतेच आभार मानत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून 14 तारखेला नाशिकच्या जनतेचे आभार मानण्यासाठी एकनाथ शिंदे नाशिकला येत आहेत. यावेळी शिवसैनिक उपमुख्यमंत्र्यांचे उत्स्फूर्तपणे स्वागत करतील आणि शिवसैनिकांना अशा कार्यक्रमांचा अनुभव आहे. ' असंही दादा भुसे यांनी सांगितले.

हेही वाचा: ज्येष्ठ गायिका आशा भोसलेंकडून उपमुख्यमंत्री शिंदेंचं कौतुक

दरम्यान मागील निवडणुकीत शिवसेनेकडून तिकीट न मिळाल्याने अनेकांमध्ये नाराजी होती त्यातच आता आगामी निवणुकांचा विचार केला तर ही बाब शिवसेनेसाठी घातक ठरू शकते. त्यामुळे आता उपमुख्यमंत्री यावर काय बोलणार याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे. 


सम्बन्धित सामग्री