Thursday, September 19, 2024 10:57:24 PM

Maharashtra
विसर्जन मिरवणुकीत खोडी कुणी काढली ?

महाराष्ट्रात गणपती विसर्जनाच्या दिवशी तणावाचे वातावरण निर्माण झाले.

विसर्जन मिरवणुकीत खोडी कुणी काढली

मुंबई : महाराष्ट्रात गणपती विसर्जनाच्या दिवशी तणावाचे वातावरण निर्माण झाले. विसर्जन मिरवणुकीतल्या आवाजावर मुसलमानांनी निर्बंध घालण्याचा प्रयत्न केला. पुण्याच्या गुलटेकडीत मुसलमानांनी मिरवणूक रोखली. ठाणे जिल्ह्यातील भिवंडीत आणि बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोदमध्ये गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीवर दगडफेक करण्यात आली. या घडामोडींमुळे गणपती विसर्जनाच्या दिवशी तणावाचे वातावरण निर्माण झाले. 

जळगाव जामोद येथे घडलेल्या घटनेमुळे गणपती विसर्जनाची मिरवणूक काही काळासाठी थांबवावी लागली. तब्बल १५ सार्वजनिक मंडळांची मिरवणूक थांबवण्यात आली. या घटनेनंतर स्थानिक भाजपा आमदार संजय कुटे यांनी आक्रमक पवित्रा घेतला. अखेर मलकापूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी देवराम गवळी यांना निलंबित करण्यात आले. नंतर पोलीस बंदोबस्तात मिरवणूक पुढे सरकली. तर भिवंडीत पोलिसांनी लाठीमार करुन परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. पोलिसांनी भिवंडी आणि जळगाव जामोदमधील घटनेप्रकरणी दगडफेक करणाऱ्या मुसलमानांची धरपकड सुरू केली आहे. 

  1. विसर्जन मिरवणुकीतल्या आवाजावर मुसलमानांचे निर्बंध
  2. पुण्याच्या गुलटेकडीत मुसलमानांनी मिरवणूक रोखली
  3. भिवंडीत अज्ञाताकडून मिरवणुकीवर दगडफेक
  4. जळगाव जामोदमध्ये मिरवणुकीवर दगडफेक
  5. पोलीस उपाध्यक्ष देवराम गवळी निलंबित

सम्बन्धित सामग्री