बीड : आमदार सुरेश धस आज बीड दौऱ्यावर होते. बीड हत्येप्रकरणी आज महादेव मुंडे कुटुंबियांची भेट घेण्यासाठी आले होते. यावेळी मुंडे समर्थकांनी आमदार धस यांना काळे झेंडे दाखवले. यावरून परळीत मुंडे समर्थकांचा सुरेश धसांना विरोध असल्याचे दिसून आले. पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले.
भाजपाचे आमदार सुरेश धस हे आज परळी येथे महादेव मुंडे कुटुंबाची भेट घेण्यासाठी आले होते . त्यानंतर वैजनाथ परळी या ठिकाणी दर्शनासाठी जात असताना परळीमध्ये त्यांना काळे झेंडे दाखवण्यात आले. यावरून भाजपा आमदार सुरेश धस यांना परळीत विरोध असल्याचे चित्र दिसून आले. मुंडे समर्थकांनी काळे झेंडे दाखवून सुरेश धस यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
हेही वाचा : पोलीस अधिकारी महाजन यांना सस्पेंड करा; सुरेश धस यांची मागणी
परळी शहरात भाजप आमदार सुरेश धस यांना मुंडे समर्थकांकडून विरोध करण्यात आला आहे. काळे झेंडे दाखवून सुरेश धस यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केल्याचे पाहायला मिळाले. देशमुख हत्याप्रकरणात मुंडे आणि परळीची जी बदनामी सुरेश धस यांच्या माध्यमातून केली जाते आहे. ती थांबवली जावी अशी आग्रही भूमिका मुंडे समर्थकांनी घेतली. दरम्यान परिस्थिती पाहता त्या ठिकाणी पोलिसांचा अतिरिक्त बंदोबस्त लावण्यात आला होता. परळीतील महादेव मुंडे खून प्रकरणात सुरेश धस यांनी मुंडे कुटुंबाची भेट घेतली. या भेटीनंतर एका कार्यकर्त्याच्या घरी जात असताना मुंडे समर्थकांनी सुरेश धसांना काळे झेंडे दाखवत त्यांचा विरोध केला. दरम्यान परिस्थिती नियंत्रणात मिळवण्यासाठी पोलीस यंत्रणा तत्पर झाल्याचे दिसले.
भाजपाचे आमदार सुरेश धस परळीहून शिरसाळा या गावातून जात असताना काही व्यक्तींनी आमदार सुरेश धस यांच्या गाडीला काळ्या फिती दाखवण्याचा प्रकार केला. यावेळी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यावेळी पोलिसांनी तरुणांना रोखण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी पोलिसांसोबत हुज्जत देखील घातल्याचे दिसून आले.