Friday, April 11, 2025 01:38:55 AM

'मुंडेंना विनाकारण टार्गेट केलं जातंय'

मुंडेंना विनाकारण टार्गेट केलं जात असल्याचं धनंजय मुंडेंच्या कार्यकर्त्यांनी म्हटले आहे.

मुंडेंना विनाकारण टार्गेट केलं जातंय

 

बीड : संतोष देशमुख हत्या प्रकरणाने राज्यातील वातावरण पेटले आहे. बीड हत्येप्रकरणात वाल्मिक कराड याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाल्मिक कराड हे मंत्री धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय असल्याने मंत्री मुंडे यांच्यावर टीका होत आहे. त्यावर मुंडेंना विनाकारण टार्गेट केलं जात असल्याचं धनंजय मुंडेंच्या कार्यकर्त्यांनी म्हटले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी  व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.

संतोष देशमुख हत्या प्रकरणात राजकारण करू नका असे मुंडेंच्या कार्यकर्त्यांनी म्हटले आहे. मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण केले आणि त्यानंतर हत्या करण्यात आली. या प्रकरणात वाल्मिक कराड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. कराड धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय असल्याने मुंडेंवर सातत्याने टीका होत आहे. त्यामुळे आता मंत्री धनंजय मुंडे यांच्या समर्थनार्थ कार्यकर्ते सरसावले आहेत.

हेही वाचा : Beed Murder Case : उद्या बीड बंद, सर्वपक्षीय नेत्यांकडून मूक मोर्चा

संतोष देशमुख हत्या प्रकरणात भाजपाचे आमदार सुरेश धस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार संदीर क्षीरसागर यांच्याकडून सातत्याने मंत्री धनंजय मुंडे यांच्या टीका होत आहे. नुकतच सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी पवारांच्या राष्ट्रवादीतील आमदार संदीप क्षीरसागर यांनी मोठे वक्तव्य केले आहे. धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्या अशी मागणी आमदार क्षीरसागर यांनी केली आहे.


सम्बन्धित सामग्री