Saturday, March 15, 2025 04:57:14 PM

मुंबई लाईफलाईनचं रूप बदलणार

मुंबईची लाईफलाईन समजल्या जाणाऱ्या मुंबई लोकलचं रूप बदलणार का? असा प्रश्न संपूर्ण मुंबईकरांना पडलाय. मुंबई लोकलचं रूप बदलणार असून मुंबईकरांचा प्रवास अधिक सुखकर होणारे.

मुंबई लाईफलाईनचं रूप बदलणार

मुंबई : मुंबईची लाईफलाईन समजल्या जाणाऱ्या मुंबई लोकलचं रूप बदलणार का? असा प्रश्न संपूर्ण मुंबईकरांना पडलाय. मुंबई लोकलचं रूप बदलणार असून मुंबईकरांचा प्रवास अधिक सुखकर होणारे. त्यामुळे संपूर्ण मुंबईकरांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळतंय. मुंबई लोकलचे डिझाइन बदलण्यात येणार असून लोकल धावण्याचा वेळेत ही बदल केले जाणार आहेत. त्यामुळे आता मुंबई लाईफलाईनमध्ये किती आणि कोणते बदल होतात याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे. 

हेही वाचा: राजन साळवींचा ठाकरेंना राम राम?

नेमके काय बदल होणार? 
रेल्वे प्रशासन लोकलची डिझाइन बदलणार
लोकलच्या डब्यांमध्ये प्रवाशांना बसण्यासाठी जागा मोठी करणार 
नव्या डब्यांची रचना अधिक मोकळी करणार 
लोकल डब्यातील व्हेंटिलेशन प्रणाली अपडेट जाणार 
लोकलच्या डब्यात प्रवाशांसाठी हवा खेळती राहील
सध्याच्या ईएमयू लोकलच्या तुलनेत नव्या डब्यामध्ये जास्त जागा असणार 
रिअल टाइम पॅसेंजर सिस्टम होणार 
स्वयंचलित दरवाजा आणि सर्वोत्तम वेंटिलेशनची प्रणाली

दरम्यान लोकलमधील गर्दी लक्षात घेऊन हा बदल करण्यात येत असून मुंबईकरांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळतंय. लोकलमध्ये वाढती गर्दी पाहता आणि मुंबईकरांचे धावपळीचे जीवन लक्षात घेता हा बदल महत्वाचा ठरणारे. त्यामुळे लवकरच मुंबई लोकलमध्ये चांगले बदल करण्यात येणार असल्याचा   विश्वास रेल्वे प्रशासनानं व्यक्त केलाय.


 


सम्बन्धित सामग्री