मुंबई : गणेश चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी दीड दिवसाच्या बाप्पाचं विसर्जन होतं. यंदा रविवारी ८ सप्टेंबर रोजी दीड दिवसांच्या बाप्पाचं विसर्जन होणार आहे. यासाठी ज्योतिषांनी मुहूर्त सुचवलाय. रविवारी दुपारी २ वाजून ८ मिनिटे ते दुपारी ३ वाजून ४१ मिनिटे तसेच संध्याकाळी ६ वाजून ४७ मिनिटे ते रात्री ११ वाजून ८ मिनिटे या वेळेत दीड दिवसाच्या बाप्पाचं विसर्जन करावं, असा सल्ला ज्योतिषांनी दिलाय.