Thursday, April 17, 2025 09:16:20 PM

महाराष्ट्र लोकसेवा आयोग सतर्क

वादग्रस्त सनदी अधिकारी पूजा खेडकर हिच्या दिव्यांग प्रमाणपत्र वादानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोग आता सतर्क झाला आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोग सतर्क
mpsc

२९ जुलै, २०२४, पुणे : वादग्रस्त सनदी अधिकारी पूजा खेडकर हिच्या दिव्यांग प्रमाणपत्र वादानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोग आता सतर्क झाला आहे. राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२२ मधील उत्तीर्ण झालेल्या ९ दिव्यांग उमेदवारांच्या दिव्यांग प्रमाणपत्राची फेर पडताळणी सोमवारपासून सुरू करण्यात आली आहे. ज्या भागातून दिव्यांग प्रमाणपत्र काढलेले आहे, त्या भागातील आरोग्य उपसंचालकांसमोर ही तपासणी होणार आहे. या तपासणीला जे उमेदवार गैरहजर राहतील त्यांची निवड देखील रद्द केली जाणार आहे. 


सम्बन्धित सामग्री