Wednesday, July 03, 2024 03:57:05 AM

Monsoon will enter Andaman on Sunday
रविवारी मान्सून अंदमानात दाखल होणार

उन्हाच्या तडाख्याने हैराण झालेल्या नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. वर्षभर चातकाप्रमाणे ज्याची सर्वच जण आतुरतेने वाट पाहतात, तो मान्सून रविवारी (दि. १९) अंदमानात दाखल होत आहे.

रविवारी मान्सून अंदमानात दाखल होणार
mansoon

पुणे,१९ मे २०२४, प्रतिनिधी : उन्हाच्या तडाख्याने हैराण झालेल्या नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. वर्षभर चातकाप्रमाणे ज्याची सर्वच जण आतुरतेने वाट पाहतात, तो मान्सून रविवारी (दि. १९) अंदमानात दाखल होत आहे. त्यानंतर ३१ मे रोजी त्याचे केरळमध्ये आगमन होणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली. दिलासादायक बाब म्हणजे यंदा मान्सून धो-धो बरणार असून, सुमारे १०६ टक्के पाऊस होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.


दरवर्षी मान्सून १ जून रोजी केरळमध्ये दाखल होतो, पण हवामान खात्याच्या अंदाजानुसार, यंदा एक दिवस आधीच म्हणजे ३१ मे रोजी मान्सून केरळमध्ये येणार आहे. हवामान विभागाने जाहीर केलेल्या तारखेला ४ दिवस कमी-जास्त होण्याची शक्यता आहे. त्यामुळे २८ मे ते ३ जूनदरम्यान मान्सून भारताच्या मुख्यभूमीत दाखल होण्याची शक्यता आहे.मान्सून हा केरळमध्ये येण्यापूर्वी अंदमान आणि निकोबार बेटांवर शिरकाव करतो. दरवर्षी २१ मे रोजी या बेटांवर मान्सून येत असतो. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, यंदा मात्र १९ मे रोजी अंदमान-निकोबार बेटांवर तो धडकणार आहे. गेल्यावर्षी अंदमानला तो १९ मे रोजी आला होता. मात्र, केरळमध्ये ९ दिवस उशिराने म्हणजे ८ जूनला पोहोचला. यंदा त्यात काही बदल होतो का, त्यावर मान्सूनचा पुढचा प्रवास अवलंबून असणार आहे.

                    

सम्बन्धित सामग्री