Wednesday, September 04, 2024 03:44:15 PM

matang community protest
मातंग समाज रस्त्यावर

अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरणाच्या मागणीसाठी मातंग समाज रस्त्यावर उतरला आहे. नांदेड जिल्ह्यात या मागणीसाठी आंदोलने होत आहेत.

मातंग समाज रस्त्यावर 
matang protest

१३ जुलै, २०२४ नांदेड : अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरणाच्या मागणीसाठी मातंग समाज रस्त्यावर उतरला आहे. नांदेड जिल्ह्यात या मागणीसाठी आंदोलने होत आहेत. 
मागील १२ दिवसांपासून प्राध्यापक रामचंद्र भराडे यांनी अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरणाच्या मागणीसाठी आमरण उपोषण सुरू केले आहे. परंतु, शासनाने त्यांच्या मागणीची दखल घेतली नाहीये. दिवसेंदिवस भराडे यांची तब्बेत खालावत चाली आहे. त्यामुळे भराडे यांना पाठिंबा म्हणून नांदेड जिल्ह्यातील मातंग समाज आता रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. शनिवारी नांदेड शहरातील अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा निघाला. या मोर्चात मातंग समाज मोठ्या संख्येने सहभागी झाला होता. अनुसूचित जाती आरक्षणाचे तात्काळ वर्गीकरण करून प्राध्यापक रामचंद्र भराडे यांचे उपोषण सोडवावे, अशी मागणी मातंग समाजाकडून केली जात आहे. मागण्या मान्य न झाल्यास येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत नेत्यांना मातंग वाड्यात येऊ देणार नसल्याचा इशारा या आंदोलकांनी दिला आहे. 

           

सम्बन्धित सामग्री