Sunday, September 08, 2024 07:09:42 AM

Manoj Soni resigns as Chairman of UPSC
मनोज सोनी यांनी सोडले केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अध्यक्षपद

नवी दिल्ली: केंद्रीय लोकसेवा आयोगाचे (यूपीएससी) अध्यक्ष मनोज सोनी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. सोनी यांनी वैयक्तिक कारणांमुळे राजीनामा दिल्याची माहिती सूत्रांनी शनिवारी दिली. वास्तविक सोनी य

मनोज सोनी यांनी सोडले केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अध्यक्षपद
Manoj Soni


नवी दिल्ली: केंद्रीय लोकसेवा आयोगाचे (यूपीएससी) अध्यक्ष मनोज सोनी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. सोनी यांनी वैयक्तिक कारणांमुळे राजीनामा दिल्याची माहिती सूत्रांनी शनिवारी दिली. वास्तविक सोनी यांचा कार्यकाळ मे २०२९ पर्यंत होता. पाच वर्षांचा कार्यकाळ बाकी असताना त्यांनी राजीनामा दिला.

परीविक्षाधीन (प्रोबेशनरी) आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांनी यूपीएससी परीक्षेत केलेले कारनामे समोर आल्यानंतर यूपीएससीवर चहूबाजूंनी टीका होत आहे. यूपीएससीच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर सोनी यांनी राजीनामा दिला आहे. तथापि, सोनी यांच्या राजीनाम्याचा खेडकर प्रकरणाशी काहीही संबंध नाही, असे यूपीएससीच्या सूत्रांनी म्हटले आहे. 


सम्बन्धित सामग्री