जालना : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आमरण उपोषणाला बसले आहेत. जालनातील अंबडमधील अंतरवाली सराटी येथून आज मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले आहेत. मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या अशी मागणी जरांगे यांनी केली आहे. तसेच आधीच्या मागण्यांवर अजूनही ठाम असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.
अंतरवाली सराटी येथे आज शनिवारी मनोज जरांगे पाटील सातव्यांदा सामूहिक उपोषणाला बसले आहेत. यावेळी त्यांनी सरकारपुढे 7-8 मागण्या ठेवल्या आहेत. संतोष देशमुखांच्या सर्व आरोपींना फाशी द्यावी. तसेच संतोष देशमुखांना न्याय मिळेपर्यंत लढत राहणार असल्याचे जरांगेंनी सांगितले आहे. शिंदे समितीला तातडीनं मुदतवाढ द्या असेही मनोज जरांगे यांनी म्हटले आहे.
हेही वाचा : ST BUS एसटीचे भाडे किती रुपयांनी वाढले ?
मनोज जरांगे पाटील यांच्या प्रमुख मागण्या
महाराष्ट्रातील मराठा समाज हा कुणबी आणि मराठा एकच मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे.
हैदराबाद गॅझेटिअर, सातारा संस्थान गॅझेटिअर, बॉम्बे गव्हर्नमेंटचे गॅझेटियर,लागू करून अंमलबजावणी करावी.
न्यायमूर्ती शिंदे समितीने राज्यभर तातडीने कुणबी नोंदी शोधण्याचे काम सुरू करावे.
सगे- सोयरे अधिसूचनेची तात्काळ अंमलबजावणी करावी .
मराठा आंदोलकांच्या केसेस सरसकट मागे घेण्यात याव्यात आणि सर्व गुन्हे रद्द करण्यात यावे.
रद्द केलेलं ईडब्लूएस आरक्षण पुन्हा सुरू करावं.
कुणबी नोंदी शोधण्यासाठी, कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी स्थापन केलेले कक्ष पुन्हा सुरू करावेत.
मराठा-कुणबी एकच आहे, हा सुधारित जीआर काढून मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे.