Wednesday, December 04, 2024 11:27:09 AM

Man brutally beaten up by drunken tourists in Pune
भांडण सोडवण्याच्या प्रयत्नात पुण्यातील मद्यधुंद पर्यटकांकडून व्यक्तीला बेदम मारहाण

भांडण सोडवण्याच्या प्रयत्नात पुण्यातील मद्यधुंद पर्यटकांकडून व्यक्तीला बेदम मारहाण

रायगड : माणगाव ते म्हसळा दरम्यान घोणसे घाटात घडलेल्या एका दुर्दैवी घटनेत सलीम धनसार नावाच्या व्यक्तीला मद्यधुंद पर्यटकांनी बेदम मारहाण केली. सलीम यांनी फक्त भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला होता, मात्र पर्यटकांनी त्यांच्यावरच हल्ला चढवला. या हल्ल्यात सलीम गंभीर जखमी झाले आहेत.

सलीम धनसार यांना तातडीने माणगाव उपजिल्हा रुग्णालयात नेऊन प्राथमिक उपचार करण्यात आले, मात्र प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना एमजीएम रुग्णालयात हलवण्यात आले आहे. सध्या त्यांची स्थिती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.
या घटनेनंतर पोलिसांनी त्वरेने कारवाई करत मारहाण करून पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या मद्यधुंद पर्यटकांना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असून संबंधित पर्यटकांविरुद्ध कठोर कारवाई केली जाणार आहे.

घटनेनंतर परिसरात भीतीचं वातावरण आहे. स्थानिक नागरिकांनी अशा प्रकारच्या घटनांवर आळा घालण्यासाठी पोलिसांकडून अधिक सतर्कता आणि कठोर कारवाईची मागणी केली आहे. पर्यटकांकडून होणाऱ्या गैरवर्तनामुळे स्थानिक लोकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.


सम्बन्धित सामग्री






jaimaharashtranews-logo