Wednesday, April 23, 2025 03:21:29 PM

कामधंदा नाही म्हणून युवकाची आत्महत्या

हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे येथे एका युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. मुंजाजी शिंदे (वय २७ वर्षे) असे मयत युवकाचे नाव आहे.

कामधंदा नाही म्हणून युवकाची आत्महत्या
suicide

२२ जुलै, २०२४ हिंगोली : हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे येथे एका युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. मुंजाजी शिंदे (वय २७ वर्षे) असे मयत युवकाचे नाव आहे. आपल्या राहत्या घरातच त्याने गळफास घेतला आहे. सोमवारी २२ जुलै रोजी सकाळी ही घटना उघडकीस आली आहे. दरम्यान, 'मला काही कामधंदा नाही, मराठ्याला आरक्षण नाही म्हणून मी आत्महत्या करीत आहे, अशा आशयाची चिठ्ठी या युवकाच्या खिशात सापडली आहे.


सम्बन्धित सामग्री