Thursday, September 19, 2024 01:45:13 PM

copy in police recruitment exam
पोलीस भरती परीक्षेत गैरप्रकार उघड

रायगड पोलीस दलातील भरती प्रक्रियेच्या लेखी परीक्षेच्या वेळी गैरप्रकार झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी ६ उमेदवारांना ताब्यात घेण्यात आलं आहे.

पोलीस भरती परीक्षेत गैरप्रकार उघड 
exam

१० ऑगस्ट, २०२४, रायगड : रायगड पोलीस दलातील भरती प्रक्रियेच्या लेखी परीक्षेच्या वेळी गैरप्रकार झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी ६ उमेदवारांना ताब्यात घेण्यात आलं आहे. धक्कादायक म्हणजे हे ६ उमेदवार आपल्या कानाला इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस लावून बसले होते. रायगड पोलिसांनी शनिवारी लेखी परीक्षेच्या दरम्यान विशेष काळजी घेतली होती. कॉपी रोखण्यासाठी तपासणीसाठी हॅण्ड हेल्ड मेटल डिटेक्टरचा वापर करण्यात आला. त्यातून हा प्रकार उघडकीस आला आहे. या उमेदवारांविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्याचबरोबर डीव्हाइस वरून जे कुणी त्यांच्या संपर्कात होते त्यांचाही शोध सुरू आहे. पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी ही माहिती दिली आहे. पोलीस शिपाई पदाच्या ३९१ जागांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे. त्यासाठी शनिवारी अलिबाग आणि पेण इथे ११ केंद्रावर लेखी परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेला ४ हजार ७४७ उमेदवार बसले होते.


सम्बन्धित सामग्री