Sunday, December 15, 2024 10:25:02 AM

Maharashtra's 3 days weather update
राज्यात ठंडीची शेकोटी पेटवणारी लाट, IMD ने दिला ३ दिवसांचा हवामान अपडेट

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, सध्या कमी दाबाचा पट्टा लक्षद्वीप आणि मालदीव भागात आहे.

राज्यात ठंडीची शेकोटी पेटवणारी लाट imd ने दिला ३ दिवसांचा हवामान अपडेट

मुंबई : थंडीचे दिवस सुरु आहेत राज्यात गरमीमुळे त्रासावलेले नागरिक थंडीच्या उत्सुकतेत होते खरं.  मात्र, आता काही दिवसांमध्येच राज्यातील गारठा चांगलाच वाढल्याचं चित्र पाहायला मिळतंय. सरासरी किमान तापमान कमालीची घट झाली असून हाड गोठवणाऱ्या बोचऱ्या थंडीने नागरिक कुडकुडले आहेत
धुळ्यात शनिवारी राज्याचे नीचांकी तापमान ४.४ अंश सेल्सिअस नोंदवले गेले आहे. उत्तरेकडील थंड हवेच्या प्रवाहामुळे महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, येत्या दोन दिवसांत पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रात कडाक्याच्या थंडीसह सकाळी धुक्याची चादर पसरण्याची शक्यता आहे. तापमानात घट होईल आणि त्यानंतर काही अंशांनी पुन्हा वाढ होईल. विदर्भात तापमानात पुढील पाच दिवस कोणताही बदल होणार नाही.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, सध्या कमी दाबाचा पट्टा लक्षद्वीप आणि मालदीव भागात आहे. चक्रकार वाऱ्यांची स्थिती समुद्रसपाटीपासून ५.८ किमी उंचीवर असल्यामुळे येत्या २४ तासात ही स्थिती पश्चिमेकडे सरकण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, उत्तरेकडील राज्यांना थंडीच्या लाटेचा इशारा दिला आहे. परिणामी, महाराष्ट्रात हाडं गोठवणारी थंडी असल्याचं वर्तवण्यात आलं आहे. उत्तर भारतातून शीतलहरी वेगाने राज्यात प्रवेश करत असून, त्यामुळे राज्यातील बहुतेक भाग गारठत आहेत. शुक्रवारी उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात कडाक्याची थंडी सुरू झाली होती. हिमालयापासून मध्य भारतापर्यंतच्या भागात थंडीने गारठले आहे. जम्मू, काश्मीर, लद्दाख, पंजाब, हरियाणा, दिल्ली, राजस्थान, मध्य प्रदेशपर्यंतच्या राज्यांमध्ये थंडीचे संकट आहे.

त्याचबरोबर,राज्यातील बहुतांश ठिकाणी आकाश निरभ्र असून, तापमानात घट होत आहे. पुणे शहरासह संपूर्ण जिल्ह्यात गारठा वाढण्यास सुरुवात झाली आहे. शुक्रवारी पुणे शहराचे किमान तापमान १४ अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आगामी पाच दिवसांत पुण्याचे तापमान आणखी घटेल. पुणे, पिंपरी-चिंचवडसह संपूर्ण जिल्ह्यात किमान तापमानात घट होऊन काही भागांत पारा ११ अंशांवर खाली गेला आहे.
विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र गारठले

उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील किमान तापमान ९ ते १० अंशांवर खाली आले होते. थंडीच्या लाटेचे प्रमाण राज्यात वाढत आहे. १४ ते १८ डिसेंबर या कालावधीत ही लाट अधिक तीव्र होण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. विदर्भ, उत्तर


सम्बन्धित सामग्री






jaimaharashtranews-logo