Saturday, January 18, 2025 11:22:33 AM

NASHIK SIHANSTHA KUMBHAMELA 2027
सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी महाराष्ट्र सज्ज!

मुख्यमंत्र्यांनी नाशिकजवळ महाकुंभ उभारून देशातील धार्मिक परंपरा, मंदिरे, तीर्थक्षेत्रे, आणि सांस्कृतिक वारसा यांचे दर्शन घडवण्यासाठी भव्य कन्व्हेंशन सेंटर उभारण्याची घोषणा केली.

सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी महाराष्ट्र सज्ज
सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नाशिक सज्ज – 2027 च्या नियोजनाची मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून आढावा बैठक

मुंबई :मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्रीच्या अतिथिगृह, मुंबई येथे सिंहस्थ कुंभमेळा 2027 च्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीत त्र्यंबकेश्वर (नाशिक) येथे ऑगस्ट ते नोव्हेंबर 2027 दरम्यान होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी पायाभूत सुविधा आणि अनुषंगिक विकासकामांवर चर्चा झाली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्वाचे निर्देश दिले.

मुख्यमंत्र्यांनी नाशिकजवळ महाकुंभ उभारून देशातील धार्मिक परंपरा, मंदिरे, तीर्थक्षेत्रे, आणि सांस्कृतिक वारसा यांचे दर्शन घडवण्यासाठी भव्य कन्व्हेंशन सेंटर उभारण्याची घोषणा केली. त्याचबरोबर, कुंभमेळ्याचे प्रभावी ब्रँडिंग करून नाशिकला जागतिक पटलावर आणण्याचा मानस व्यक्त केला.

👉👉 हे देखील वाचा : नाशिकमध्ये 2027 साठी महाकुंभाची निर्मिती करा; मुख्यमंत्र्यांच्या सूचना

भाविकांसाठी सुटसुटीत वाहतूक व्यवस्थेसाठी उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. साधुग्रामसाठी लागणाऱ्या जमिनीचे संपादन, नगररचना परियोजन आखून हस्तांतरणीय विकास हक्क स्थापित करणे, तसेच अतिक्रमणे हटवण्याचे आदेश देण्यात आले.

पर्यटकांसाठी 8-10 हेलिपॅड्स उभारण्याबरोबरच, समृद्धी महामार्गाद्वारे नाशिकला जोडणारे रस्ते गतीने पूर्ण करण्याची आवश्यकता अधोरेखित करण्यात आली. इगतपुरी ते नाशिक मार्ग प्रशस्त करण्यासह गोदावरी नदी आणि उपनद्यांचे शुद्धीकरण करण्यावर भर देण्यात आला आहे.

या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री गिरीश महाजन आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. कुंभमेळ्याच्या माध्यमातून नाशिकच्या स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देण्याचा हा एक महत्त्वपूर्ण प्रयत्न असल्याचे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.

👉👉 जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.
 


सम्बन्धित सामग्री