Sunday, December 22, 2024 11:51:10 AM

Leaders paid tribute to Ratan Tata
रतन टाटांना नेतेमंडळींनी वाहिली श्रद्धांजली

उद्योगपती रतन टाटा यांचे वृद्धापकाळी निधन झाले आहे. दानशूर व्यक्तीमत्व आपल्यातून हरपले आहे.

रतन टाटांना नेतेमंडळींनी वाहिली श्रद्धांजली


मुंबई : उद्योगपती रतन टाटा यांचे वृद्धापकाळी निधन झाले आहे. दानशूर व्यक्तीमत्व आपल्यातून हरपले आहे. ८६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. टाटा यांच्या निधनानंतर समाजमाध्यमांमधून पंतप्रधान, राष्ट्रपतींसह अनेक नेतेमंडळींच्या प्रतिक्रिया समोर आल्या आहेत.
रतन टाटा दूरदर्शी उद्योगपती होते. एक दयाळू आत्मा आणि एक विलक्षण मानव होते असे म्हणत पंतप्रधान मोदींनी दु:ख व्यक्त केलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनीही भावना व्यक्त केल्या आहेत. उद्योगाच्या वाढीला राष्ट्रनिर्माणाशी जोडणारे व्यक्तिमत्त्व असे उद्गार त्यांनी टाटांच्या श्रद्धांजली काढले आहे. 
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जगाने अनमोल रत्न गमावले असे म्हणत रतन टाटांना श्रद्धांजली वाहिली आहे.तर रतन टाटांची जागा कोणीही भरू शकत नाही. रतन टाटा स्वतःपेक्षा जास्त देशासाठी, समाजासाठी जगले. अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी रतन टाटांना श्रद्धांजलीपर दिली आहे. 

        

सम्बन्धित सामग्री






jaimaharashtranews-logo