Thursday, November 21, 2024 05:22:11 PM

badalapur rape case protest
आंदोलकांवर लाठीमार, पोलिसांवर दगडफेक

बदलापूर येथील एका नामांकित शाळेच्या स्वच्छतागृहात ४ आणि ६ वर्षीय दोन मुलींवर लैंगिक अत्याचाराची घटना समोर आली. या प्रकरणी ८ ते १० तासांपासून आंदोलन सुरु होते. या आंदोलनाला गालबोट लागलं आहे.

आंदोलकांवर लाठीमार पोलिसांवर दगडफेक 

२० ऑगस्ट, २०२४, कल्याण : बदलापूर येथील एका नामांकित शाळेच्या स्वच्छतागृहात ४ आणि ६ वर्षीय दोन मुलींवर लैंगिक अत्याचाराची घटना समोर आली. यानंतर सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणी ८ ते १० तासांपासून आंदोलन सुरु होते. या आंदोलनाला गालबोट लागलं आहे. आंदोलक ऐकत नसल्यानं अखेर पोलिसांना आंदोलकांवर लाठीमार करावा लागला. पोलिसांनी लाठीमार केल्यानंतर संतप्त आंदोलकांनीही पोलिसांवर पुन्हा दगडफेक केली.

नेमकं काय घडलं ?

आंदोलकांची गर्दी पांगविण्यासाठी आणि स्टेशनवरची गर्दी कमी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस दल आणण्याचा निर्णय घेण्यात आला. वारंवार विनंती करून आंदोलक माघार  घेत नसल्याने गर्दी कमी करण्यासाठी पोलिसांनी पोलीस बळाचा वापर करण्याचा प्रयत्न केला असता संतप्त आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केली. या दगडफेकीनंतर पोलिसांनी काढता पाय घेतला. दगडफेकीत तीन ते चार पोलीस जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

काय आहे प्रकरण ?

बदलापूर येथील एका नामांकित शाळेच्या स्वच्छतागृहात ४ आणि ६ वर्षीय दोन मुलींवर लैंगिक अत्याचाराची घटना समोर आली. यानंतर सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. बदलापुरात हजारो नागरिक रस्त्यावर उतरुन आंदोलन करत आहेत. या शाळेतील व्यवस्थापनाविरोधात बदलापूर पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास उशीर केल्याने संतप्त पालकांनी शाळेला घेराव घातला होता. त्यानंतर शाळेची तोडफोड करण्यात आली. या प्रकरणातील आरोपीला अटक करण्यात आली आहे. तसंच गुन्हा दाखल करण्यास हलगर्जी करणाऱ्या पोलिसांवरही कारवाई करण्यात आली. शाळेनेही संबंधित मुख्याध्यापिकेला निलंबित केले आहे. तसेच, मुलांची जबाबदारी असलेल्या दोन सेविकांना सेवेतून कमी करण्यात आलं आहे. आरोपीला कठोरात कठोर शिक्षा करण्याची मागणी आंदोलक करत आहेत. 


सम्बन्धित सामग्री


jaimaharashtranews-logo