मुंबई : 2025 हे वर्ष सुरु होण्यास अवघे 2 आठवडे राहिले आहेत. 2024 हे वर्ष कोणासाठी सुख समृद्धीचं तर कोणासाठी दुःखा कष्टाचं गेलं असेल. आपली सगळी दुःखे, कामात येणारी विघ्ने आणि किंवा इतर दुःख देणाऱ्या गोष्टी पाठी ठेवून सर्वाना 2025 मध्ये खुशाल जीवन जगायची इच्छा नक्कीच असेल. गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता म्हटले जाते. 'विघ्नहर्ता' म्हणजे असा "जो अडथळे दूर करतो". डिसेंबर महिन्यात येणार संकष्टी चतुर्थी ही कृष्ण पक्षातील चौथी तिथी संकष्टी चतुर्थी म्हणून ओळखली जाते. ही संकष्टी तुमचासाठी लाभदायक, शुभ आणि सुखकारक व्हावी त्यासाठी जाणून घ्या संकष्टी चतुर्थीचे विधी, मुहूर्त आणि सगळं काही.
हिंदू पंचांगानुसार मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील संकष्टी चतुर्थी तिथी बुधवारी 18 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजून 6 मिनिटांनी सुरु होईल आणि गुरुवार 19 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजून 2 मिनिटांनी संपेल. निशा कालावधीत होणाऱ्या पूजेमुळे संकष्टी चतुर्थीचे व्रत 18 डिसेंबरला केले जाईल.
पूजेचं महत्व
श्रीगणेशाची पूजा केल्याने सर्व संकटांचा नाश होतो. श्रीगणेशाला संकटविघ्न निवारक म्हणून ओळखले जाते. त्याची पूजा केल्याने जीवनातील अडचणींवर मात केली जाते. हे व्रत केल्याने घरात सुख आणि समृद्धी येते. आर्थिक लाभ होऊन व्यवसायात प्रगती होते. श्रीगणेशाच्या आशीर्वादाने इच्छित गोष्टी साधता येतात.
कोणते आहेत शुभ मुहूर्त?
- ब्रह्म मुहूर्त: पहाटे 5:19 ते 6:40
- विजय मुहूर्त: दुपारी 2:01 ते 2:42
- संध्याकाळची शुभ वेळ: 5:25 ते 5:52
- अमृतकाल: सकाळी 6:30 ते 8:07
कशी करावी पूजा?
संकष्ट चतुर्थीच्या दिवशी ब्रह्म मुहूर्तात उठून स्नान करा. देवघर स्वच्छ करून घ्या. नंतर सूर्यदेवाला जल अर्पण करा. श्रीगणेशाची मूर्ती किंवा चित्र स्थापित करून आणि गंगाजल व पंचामृताने अभिषेक करा. कुंकू, हळद आणि चंदन लावून मूर्तीला सजवा, हार आणि फुलांनी त्याला अलंकार करा. तुपाचा दिवा प्रज्वलित करून घ्या आणि मोदक व नैवेद्य अर्पण करा. "ॐ गणेशाय नमः" या मंत्राचा जप करा आणि श्रीगणेशाची आरती करून घ्या.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. जय महाराष्ट्र त्याची हमी देत नाही.)