Sunday, June 30, 2024 09:17:04 AM

last day for campaign
प्रचार तोफा थंडावणार

लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील प्रचाराचा शनिवारी शेवटचा दिवस आहे. त्यामुळे या शेवटच्या दिवशी महायुती आणि महाविकास आघाडीकडून सभांचा धडाका पाहायला मिळणार आहे.

प्रचार तोफा थंडावणार 
voting

मुंबई, १८ मे, २०२४, प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील प्रचाराचा शनिवारी शेवटचा दिवस आहे. त्यामुळे या शेवटच्या दिवशी महायुती आणि महाविकास आघाडीकडून सभांचा धडाका पाहायला मिळणार आहे. 
शनिवारी १८ मे, २०२४ रोजी सायंकाळी पाचव्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. राज्यातील एकूण १३ जागांसाठी सोमवारी २० मे, २०२४ रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीत दिग्गज उमेदवारांच्या प्रतिष्ठा पणाला लागल्या आहेत. 
देशभरात २० मे रोजी पाचव्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. देशात उत्तर प्रदेशातील १४ जागांसाठी, महाराहस्त्रातील १३ जागांसाठी, पश्चिम बंगालमधील ७ जागांसाठी, बिहार आणि ओडिशामध्ये प्रत्येकी ५ जागांसाठी, झारखंडमध्ये ३ जागांसाठी जम्मू - काश्मीर आणि लडाखमध्ये प्रत्येकी १ जागेसाठी मतदान होणार आहे. पाचव्या आणि शेवटच्या टप्प्यात महाराष्ट्रातील धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबईतील सहा मतदारसंघात मतदान पार पडणार आहे. 

लोकसभा निवडणूक पाचवा टप्पा
सहा राज्य आणि दोन केंद्रशासित प्रदेशांतील ४९ मतदारसंघ
उत्तर प्रदेश १४ - रायबरेली, अमेठी, मोहनलालगंज (SC), लखनौ, जालौन, झांसी, हमीरपूर, बांदा, फतेहपूर, कौशांबी (SC), बाराबंकी (SC), फैजाबाद, कैसरगंज, गोंडा
महाराष्ट्र १३ - उत्तर मुंबई, वायव्य मुंबई, ईशान्य मुंबई, उत्तर मध्य मुंबई, दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, कल्याण, धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, ठाणे, भिवंडी
पश्चिम बंगाल ०७ - बनगाव, बराकपूर, हावडा, उलुबेरिया, श्रीरामपूर, हुगळी, आरामबाग
बिहार ०५ - सारन, मधुबनी, सीतामढी, मुझफ्फरपूर, हाजीपूर (SC)
ओडिशा ०५ - बोलंगीर, बारगढ, सुंदरगड, आस्का, कंधमाल
झारखंड ०३ - चतरा, कोडरमा, हजारीबाग
जम्मू काश्मीर ०१ - बारामुल्ला
लडाख ०१ - लडाख

प्रमुख उमेदवार
उत्तर प्रदेश
अमेठी: स्मृती इराणी (भाजपा) आणि किशोरी लाल शर्मा (काँग्रेस)
रायबरेली: राहुल गांधी (काँग्रेस)
लखनऊ: राजनाथ सिंह (भाजपा)
कैसरगंज: करण भूषण सिंग (भाजपा) 
बिहार
हाजीपूर: चिराग पासवान (लोक जनशक्ती पार्टी- रामविलास)
सरन: रोहिणी आचार्य (राजद) आणि राजीव प्रताप रुडी (भाजपा)
मुझफ्फरपूर: राजभूषण चौधरी (भाजपा)
जम्मू काश्मीर
बारामुल्ला: ओमर अब्दुल्ला (जेके नॅशनल कॉन्फरन्स)
झारखंड
चतरा: कृष्णा नंद त्रिपाठी (काँग्रेस) 

लोकसभा निवडणूक, पाचवा टप्पा - महाराष्ट्र, मतदान २० मे २०२४

१ धुळे - सुभाष भामरे, भाजपा विरुद्ध डॉ. शोभा बच्छाव, काँग्रेस विरुद्ध अब्दुर रहमान, वंचित
२ दिंडोरी - भारती पवार, भाजपा विरुद्ध भास्कर भगरे, राशप विरुद्ध गुलाब बर्डे, वंचित
३ नाशिक - हेमंत गोडसे, शिवसेना विरुद्ध राजाभाऊ वाजे, शिउबाठा
४ पालघर - डॉ. हेमंत सावरा, भाजपा विरुद्ध भारती कामडी, शिउबाठा विरुद्ध विजया म्हात्रे, वंचित
५ भिवंडी - कपिल पाटील, भाजपा विरुद्ध सुरेश उर्फ बाळ्या मामा म्हात्रे, राशप विरुद्ध निलेश सांबरे, वंचित
६ कल्याण - डॉ. श्रीकांत शिंदे, शिवसेना विरुद्ध वैशाली दरेकर राणे, शिउबाठा
७ ठाणे - नरेश म्हस्के, शिवसेना विरुद्ध राजन विचारे, शिउबाठा
८ उत्तर मुंबई - पीयूष गोयल, भाजपा विरुद्ध भूषण पाटील, काँग्रेस विरुद्ध बीना सिंह, वंचित
९ उत्तर मध्य मुंबई - अॅडव्होकेट उज्ज्वल निकम, भाजपा विरुद्ध वर्षा गायकवाड, काँग्रेस विरुद्ध वारिस पठाण, एमआयएम
१० दक्षिण मुंबई - यामिनी जाधव, शिवसेना विरुद्ध अरविंद सावंत, शिउबाठा
११ दक्षिण मध्य मुंबई - राहुल शेवाळे, शिवसेना विरुद्ध अनिल देसाई, शिउबाठा विरुद्ध अबुल खान, वंचित
१२ वायव्य मुंबई - रवींद्र वायकर, शिवसेना विरुद्ध अमोल कीर्तीकर, शिउबाठा विरुद्ध संजीव काळकोरी, वंचित
१३ ईशान्य मुंबई - मिहीर कोटेचा, भाजपा विरुद्ध संजय दीना पाटील, शिउबाठा


सम्बन्धित सामग्री