Wednesday, February 19, 2025 10:09:17 PM

Kitchen math is broken
किचनचे गणित बिघडले..

सर्वसामान्यांना बसलेला महागाईचा विळखा नवीन वर्षातही सैल होण्याची हमी नाही.

किचनचे गणित बिघडले

संभाजीनगर : सर्वसामान्यांना बसलेला महागाईचा विळखा नवीन वर्षातही सैल होण्याची हमी नाही. कारण साखर व खाद्यतेलाच्या दरात पुन्हा एकदा नव्याने वाढ झाली आहे. अशीच भाववाढ होत राहिली तर किचनचे गणित बिघडणार, हे तेवढेच सत्य आहे. 

मध्यंतरी खाद्यतेलाच्या किमती कमी झाल्या होत्या. पण, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत युद्धजन्य परिस्थितीमुळे पुन्हा खाद्यतेलाच्या किमतीत 'आग लागणे' सुरू झाले आहे. डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेच्या सत्तेत आल्यापासून डॉलर दिवसेंदिवस मजबूत होत आहे. त्यासमोर रुपयाचा टिकाव लागत नसून रुपयात घसरण होत आहे. अमेरिकेने लादलेल्या 'टॅरिफ'मुळे डॉलर मजबूत होण्यास आणखी गती मिळाली आहे. परिणामी, खाद्यतेलाची आयात महाग झाल्याने त्याचा थेट परिणाम स्थानिक बाजारात दिसून आला. सोयाबीन तेल, सूर्यफूल तेल व पामतेलाच्या किंमतीत लिटरमागे दोन रुपयांनी भाववाढ झाली आहे.


हेही वाचा : धस यांच्या भेटीला राजकीय संशयाचं वलय; विरोधकांकडून जोरदार निशाणा

भाव वाढतच राहणार

व्यापारी वर्तुळात साखरेतील भाववाढीने निर्यातीलाही फटका बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे. डॉलरचे भाव कमी होण्यास तयार नाहीत. यामुळे आयात महाग होऊन त्याचा परिणाम खाद्यतेलाच्या किमतीवर होत आहे.सध्याची परिस्थिती लक्षात घेता डॉलरचे भाव आणखी वाढतील, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. 

दोन रुपयांनी साखर महागली

फेब्रुवारीत शिवजयंती, महाशिवरात्र आहे. केंद्र सरकारने या महिन्याचा साखर कोटा 22.5 लाख मे. टन जाहीर केला आहे. यंदा साखरेचे उत्पादन कमी व त्यात साखर निर्यातीला 10 लाख टनांची परवानगी दिली आहे.
 


सम्बन्धित सामग्री