Sunday, March 16, 2025 07:10:43 PM

जरांगेचं पुन्हा साखळी उपोषण

15 फेब्रुवारीपासून राज्यभरात मराठा समाजाचं बेमुदत साखळी उपोषण होणार असल्याची घोषणा मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी केलीय.

जरांगेचं पुन्हा साखळी उपोषण


महाराष्ट्र : अनेक महिन्यांपासून राज्यात मराठा समाज आरक्षणासाठी अनेक आंदोलन करतांना पाहायला मिळाला. तरी अजूनही मराठा आरक्षणाबाबत कोणताही निर्णय होतांना दिसत नाहीय. यातच आता पुन्हा एकदा मराठा आरक्षणासाठी गेल्या अनेक महिन्यांपासून लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांनी इशारा दिलाय. मागण्यांची अंमलबजावणी न केल्यानं जरांगेंचा आक्रमक पवित्रा पाहायला मिळतोय. याच पार्शवभूमीवर 15 फेब्रुवारीपासून राज्यभरात मराठा समाजाचं बेमुदत साखळी उपोषण होणार असल्याची घोषणा मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी केलीय. 

हेही वाचा: भाजपा कार्यकर्त्यांकडून फटाके फोडून जल्लोष

काय म्हणाले मनोज जरांगे? 
मागण्यांची अंमलबजावणी न केल्यानं जरांगेंचा आक्रमक पवित्रा 
15 फेब्रुवारीपासून राज्यभरात मराठा समाजाचं बेमुदत साखळी उपोषण
मराठा आंदोलक मनोज जरांगे यांची घोषणा
मुंबईतही जाऊन आंदोलन करणार असल्याचा जरांगेंचा इशारा
दोन तीन दिवसात मुंबईतल्या आझाद मैदानाची करणार पाहणी
आयुष्यभर फडणवीसांना गादीला शिवू देणार नाही 

हेही वाचा: पराभवानंतर अरविंद केजरीवालांची पहिली प्रतिक्रिया

दरम्यान मागण्यांची अंमलबजावणी न केल्यानं मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय. येत्या 15 फेब्रुवारी पासून राज्यभरात मराठे बेमुदत साखळी उपोषण सुरु करणार असल्याची घोषणा जरांगे यांनी केलीये. अंतरवाली सराटीतून या आंदोलनाला सुरुवात होणार असून याचे लोण राज्यभरात पसरणार असल्याचं जरांगे यांनी म्हंटलंय. 

मराठा आरक्षणाचा इतिहास: 

सरकारी नोकऱ्या आणि शैक्षणिक संस्थांमध्ये मराठा सामाजाला आरक्षण असावे यासाठी 1997 मध्ये पहिले मराठा आंदोलन करण्यात आले. ही चळवळ सुरुवातीला स्थानिक पातळीवर सुरु होती. 2008-09 मध्ये शरद पवार, विलासराव देशमुख अशा नेत्यांनी या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला. 2014  पर्यंत महाराष्ट्रातील प्रत्येक पक्षाने या आंदोलनाची बाजू घेतली. 

छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज उदयनराजे भोसले व युवराज संभाजी राजे भोसले यांनी मराठा आरक्षणासाठी पुढाकार घेतला. मराठा आरक्षणासाठी राज्याच्या सर्व विभागांत परिषदा घेतल्या गेल्या. हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयामध्ये गेले. तेव्हा त्यांनी मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला स्थगिती दिली. पुढे मराठा समाजाच्या आरक्षणाला स्थगिती देणारा मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश रद्द करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. 

दरम्यान आता 15 फेब्रुवारीपासून राज्यभरात मराठा समाजाचं बेमुदत साखळी उपोषण होणार असल्याची घोषणा मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी केलीय त्यामुळे आता हे साखळी उपोषण कोणतं वळण घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणारे. 


सम्बन्धित सामग्री