Sunday, September 08, 2024 07:09:10 AM

Nashik
नाशकात संतधारेमुळे धरणातील पाणीसाठ्यात वाढ

नाशकात संतधारेमुळे गंगापूर आणि दारणा धरणाच्या पाणीपातळीत वाढ झाली असल्याचे पाहायला मिळत आहे.


नाशकात संतधारेमुळे धरणातील पाणीसाठ्यात वाढ

नाशिक : पावसाळा सुरू होऊनही नाशिकात पाऊस नसल्याचे चित्र होते. मात्र गेल्या दोन दिवसांपासून नाशिक शहर आणि जिल्ह्यात संतधार पाऊस सुरू आहे. इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वरमध्ये असलेल्या धरण परिसरात देखील चांगला पाऊस झाला आहे. दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संतधार पावसामुळे काही प्रमाणात का होईना? पण गंगापूर आणि दारणा धरणाच्या पाणीपातळीत वाढ झाली असल्याचे पाहायला मिळत आहे. या पावसाने गंगापूर धरणात ३५ टक्के तर दारणा धरणात ६० टक्के पाणी भरल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. 
त्याचबरोबर गेल्या काही दिवसांपासून दांडी मारलेल्या पावसाचे पुनरागमन झाल्याने शेतकरी वर्गातदेखील आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. नाशकात संथ गतीने पाऊस चालु असला तरी मुसळधार पावसाची प्रतीक्षा कायम आहे तसेच जिलह्याचा पाणीसाठा २५ टक्क्यांवर आहे. 
 

                 

सम्बन्धित सामग्री