Wednesday, January 22, 2025 01:52:33 AM

Increase in the number of Chikungunya patients
राज्यात चिकुनगुनियाच्या रूग्णांच्या संख्येत वाढ

राज्यात चिकुनगुनियाचे रुग्ण वाढले आहेत.

राज्यात चिकुनगुनियाच्या रूग्णांच्या संख्येत वाढ

मुंबई : राज्यात चिकुनगुनियाचे रुग्ण वाढले आहेत. गेल्या सहा वर्षांच्या तुलनेत सर्वाधिक 5,757 रुग्ण 2024 मध्ये सापडले आहेत. त्यात पहिल्या क्रमांकावर नागपूर शहर आणि दुसऱ्या क्रमांकावर मुंबई आहे. यंदा रुग्ण मोठ्या संख्येने वाढल्याने वैद्यकीय वर्तुळात हा चर्चेचा विषय झाला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी  व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.

 

चिकुनगुनिया हा विषाणूजन्य आजार एडिस इजिप्ती आणि एडिस अल्बोपिक्टस डासांच्या संक्रमित मादीपासून फैलावतो. डेंग्यूसारखी लक्षणे असली तरी या आजारासाठी भिन्न उपचारांची आवश्यकता असते. राज्याच्या आरोग्य विभागामार्फत रुग्ण शोधण्यासाठी सर्वेक्षण करण्यात येत आहे.

हेही वाचा : लोकलच्या तिन्ही मार्गावर रविवारी मेगाब्लॉक

 

याआधी चिकुनगुनिया आजाराचे रुग्ण राज्याच्या ग्रामीण भागात आढळत असत. आता मुंबईतही त्याच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. या आजारात लक्षणानुसार औषध दिले जाते. आजूबाजूच्या परिसरात डास होणार नाही, याची दक्षता घ्या, डासांपासून संरक्षण करा. कुठल्याही प्रकारचा ताप आणि अंगदुखी असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा असे सेंट जॉर्जेस हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी सांगितले आहे.

 

महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ऑक्टोबर 2024 पर्यंत चिकुनगुनिया रुग्णांची माहिती प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार या आजाराचे 12,587 रुग्ण आढळून आले आहेत. त्यामध्ये सर्वाधिक 4,792 रुग्ण महाराष्ट्रात आढळले. तर दुसऱ्या क्रमांकावर कर्नाटक आहे. तेथे 2,213 रुग्ण आढळले आहेत.

 

चिकुनगुनियाची लक्षणे काय?

चिकुनगुनिया झालेल्या रुग्णाला दोन ते बारा दिवस जास्त ताप येतो. सांधे दुखतात, काही रुग्णांमध्ये वेदना अनेक आठवडे, महिनेही टिकतात. चिकुनगुनिया झाल्यावर सांध्यांना सूज येते. आजारपणाच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी अंगावर पुरळ येतो. तर चिकुनगुनिया झाल्यावर डोकेदुखी, डोके दाबल्यासारखे जाणवते.


सम्बन्धित सामग्री