२८ सप्टेंबर, २०२४, मुंबई : कागद महागल्यामुळे दहावी आणि बारावी परीक्षा शुल्कात १२ टक्के वाढ करण्यात आली आहे. दहावीचे ४७० तर बारावीचे ४९० रुपये शुल्क झाले आहे.
राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने यंदापासून इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षा शुल्कात मागील वर्षाच्या तुलनेत १२ टक्क्याने वाढ केली. दरवर्षी विद्यार्थ्यांची संख्या वाढत असल्यामुळे कागदाच्या किमतीतही वाढ होत आहे त्यामुळे ही शुल्क वाढ करण्यात आले असल्याचे मंडळातील अधिकाऱ्यांनी सांगितल आहे. त्यामुळे, आता दहावीसाठी ४२०0 ऐवजी ४७० रुपये मोजावे लागतील तर बारावीसाठी ४४० रुपये ऐवजी ४९० रुपये पालकांना भरावे लागणार आहेत. दरम्यान, या शुल्कासह प्रशासकीय शुल्क,गुणपत्रिका शुल्क, प्रमाणपत्र शुल्क आणि प्रात्यक्षिक परीक्षा शुल्कातही वाढ करण्यात आली आहे.