Thursday, September 19, 2024 05:13:51 AM

cabinate decision
राज्य मंत्रिमंडळाचे महत्वाचे निर्णय

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.

राज्य मंत्रिमंडळाचे महत्वाचे निर्णय 
eknath shinde

३० जुलै, २०२४, मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य यावेळी उपस्थित होते. यामध्ये ठाणे पालिकेच्या विविध उपक्रमांसाठी शासकीय जमीन देण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये महिलांच्या सक्षमीकरणासाठी जेंडर ट्रान्सफॉरमेटीव्ह मॅकॅनिझम उपक्रम राबविण्यासही मान्यता देण्यात आली आहे.

काय आहे राज्य मंत्रिमंडळाचे निर्णय ?

  • वसतिगृहे, आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांचे दरडोई अनुदान वाढविले; प्रती विद्यार्थी प्रती महिना १५०० रुपयांवरुन २२०० रुपये
  • आदिवासी सहकारी सूत गिरण्यांना दीर्घ मुदतीचे कर्ज
  • नांदेडच्या श्री गुरुजी रुग्णालयास शासकीय भाग भांडवल उपलब्ध करून देण्यास मान्यता
  • महाराष्ट्रातील कारागृहे होणार अद्ययावत; सुधारणांसाठी अध्यादेश काढणार
  • ‘नव तेजस्विनी’ महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्प सात वर्षांसाठी राबवणार
  • राज्यातील जुन्या जलविद्युत प्रकल्पांचे होणार आधुनिकीकरण
  • अमरावती जिल्ह्यातील ‘पूर्णामाय’ सहकारी सूतगिरणीला अर्थसहाय्य
  • ठाणे महानगरपालिकेच्या विविध उपक्रमांसाठी शासकीय जमीन; कन्व्हेंशन सेंटर, पक्षी गृह उभारणार
  • राज्यातील यंत्रमाग सहकारी संस्थांना आता राज्य शासनाकडून अर्थसहाय्य
  • आदिम जमातीतील कुटुंबांनाही मिळणार घरे

सम्बन्धित सामग्री