Thursday, April 17, 2025 11:51:38 AM

'काश! हमारी भी एक औलाद...' कोणत्या कारणामुळे शंभूराजेंविषयी औरंगजेबाने केले विधान

छत्रपती संभाजी महाराजांसाठी औरंगजेबाने &quotकाश! हमारी भी एक औलाद होती उस संभाजी की तरह... हिंदुस्तान क्या? पूरी दुनिया मेरी होती!&quot असे विधान का केला असावा? से विधान का केला असावा? चला तर जाणून घेऊया.

काश हमारी भी एक औलाद कोणत्या कारणामुळे शंभूराजेंविषयी औरंगजेबाने केले विधान

छावा चित्रपट पाहिल्यावर चित्रपटातील अनेक डायलॉग प्रसिद्ध झाले. छावा चित्रपटातील सर्व कलाकारांनी उत्कृष्टपणे डायलॉग सादर केले. हे डायलॉग ऐकल्यावर अनेकांच्या अंगावर शहारे येतात. मात्र, मुघल साम्राज्यचा क्रूर शासक औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांना पकडून अमानुष छळ केला. मात्र, मरेपर्यंत छत्रपती संभाजी महाराज न झुकता आपल्या स्वराज्याला जिवंत ठेवले आणि धर्मांतर करण्यास मनाई केली. छत्रपती संभाजी महाराजांच्या अद्वितीय शौर्यापुढे अखेर औरंगजेबसुद्धा हार मानला आणि म्हणला, "काश! हमारी भी एक औलाद होती उस संभाजी की तरह... हिंदुस्तान क्या? पूरी दुनिया मेरी होती!". हा डायलॉग ऐकल्यावर प्रेक्षकांच्या डोळ्यात छत्रपती संभाजी महाराजांसाठी डोळ्यातून अश्रू पाहायला मिळतो. 
                         मात्र, अनेकांच्या मनात हा प्रश्न पडला असेल की छत्रपती संभाजी महाराजांसाठी औरंगजेबाने "काश! हमारी भी एक औलाद होती उस संभाजी की तरह... हिंदुस्तान क्या? पूरी दुनिया मेरी होती!" असे विधान का केला असावा? चला तर जाणून घेऊया. 


औरंगजेबाने केलेल्या अमानुष अत्याचारानंतरही छत्रपती संभाजी महाराजांचे न झुकणे:

1689 मध्ये औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांना कैद केले होते. त्यानंतर अनेक दिवस औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांवर अत्यंत क्रूर आणि अमानुष अत्याचार केला. मात्र, अमानुष अत्याचार करूनही संभाजी महाराजांनी मुघलांपुढे शरण जाण्यास स्पष्ट नकार दिला. धर्मांतर, आपले गुपित उघड करणे किंवा औरंगजेबाला साथ देणे अशा कोणत्याही गोष्टींसाठी छत्रपती संभाजी महाराज कधीच तयार नाही झाले. त्यांनी मृत्यूला मिठी मारले,  पण आपल्या स्वाभिमानाला तडा जाऊ दिला नाही.


औरंगजेबाची मानसिक अवस्था:

औरंगजेब हा एक महत्त्वाकांक्षी आणि निर्दयी सम्राट होता. त्याला केवळ भारतावरच नव्हे, तर पूर्ण जगावर राज्य करायचे होते. त्यासाठी औरंगजेबाने आपल्याच मोठ्या भावाचा म्हणजेच दारा शुकोह याला मारून टाकले. एवढ्यावर न थांबता औरंगजेबाने आपल्याच वडिलांना (शाहजहान) कैद करून ठेवले होते आणि अनेकांना धर्मांतरासाठी अत्याचार केले. पण तरीही, तो सर्वत्र विरोधाला सामोरा जात होता. अशा स्थितीत, त्याने संभाजी महाराजांचा अपमान करून त्यांना झुकवण्याचा प्रयत्न देखील औरंगजेबाने केला, पण ते व्यर्थ ठरले.
               छत्रपती संभाजी महाराजांची निष्ठा, त्यांचे आत्मसन्मानासाठी दिलेले बलिदान, आणि कुठल्याही परिस्थितीत हार न मानण्याचा त्यांचा बाणा पाहून औरंगजेबाला जाणवले आणि म्हणाला, 'जर संभाजीसारखा मुलगा आपला असता, तर फक्त हिंदुस्थानच नाही तर संपूर्ण जगावर मी राज्य केलो असतो'. त्यामुळेच, औरंगजेब दुःख आणि आश्चर्य मिश्रित भावनेने उद्गारला. 

"काश! हमारी भी एक औलाद होती उस संभाजी की तरह... हिंदुस्तान क्या? पूरी दुनिया मेरी होती!" असे विधान औरंगजेबाने का केले?

1 - सत्य आणि निष्ठेचे महत्त्व:

औरंगजेब शेवटपर्यंत छत्रपती संभाजी महाराजांना कोणत्याही मोहात पाडता आले नाही. त्यामुळे, त्यांच्या निष्ठेचा आणि आत्मसन्मानाचा औरंगजेबाला हेवा वाटला.


2 - पराक्रम आणि धैर्य:

मराठ्यांचे ध्येय फक्त स्वराज्य स्थापनेपुरते नव्हते, तर त्यांनी मुघल सत्तेच्या विरोधात स्वतंत्र अस्तित्व टिकवले. औरंगजेबाला वाटले की, त्याच्या सैन्यात आणि कुटुंबात जर संभाजीसारखा एखादा पराक्रमी योद्धा असता, तर तो अखंड जग जिंकू शकला असता.


3 - मुलांबाबतची हतबलता:

औरंगजेबाची स्वतःची मुलेच त्याच्या विचारांशी सहमत नव्हती. त्याचा मुलगा मुअज्जम याने तर पुढे हिंदूंसाठी औरंगजेबाच्या तुलनेने सौम्य धोरण अवलंबले. संभाजीसारख्या निष्ठावान आणि बलिदानी मुलाची कमी औरंगजेबाला जाणवली.


सम्बन्धित सामग्री