Thursday, September 19, 2024 05:37:57 AM

How many beloved sisters have benefited ?
नाशकात किती लाडक्या बहिणींनी घेतला लाभ ?

नाशिक जिल्ह्यात ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेत एकही पात्र महिला लाभार्थी योजनेपासून वंचित राहता कामा नये यासाठी सूचना देण्यात आल्या आहेत.

नाशकात किती लाडक्या बहिणींनी घेतला लाभ
mazi ladaki bahin

३० जुलै, २०२४, नाशिक : नाशिक जिल्ह्यात ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेत एकही पात्र महिला लाभार्थी योजनेपासून वंचित राहता कामा नये यासाठी सूचना देण्यात आल्या आहेत. स्थानिक प्रशासनाने घरोघरी पोहोचून सर्व पात्र महिलांची नोंद करावी, अशा सूचना पालकमंत्री दादा भुसे यांनी दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे दिल्या आहेत. पात्र महिलांनी अर्ज लवकरात लवकर भरावेत यासाठी प्रत्येक तालुक्यातील लोकप्रतिनिधी, स्थानिक प्रशासन यांनी लाभार्थ्यांना अर्ज भरण्यासाठी सहकार्य करावे, अशा सूचनाही त्यांनी केल्या आहेत. 
या योजनेत १ ते ३० जुलै २०२४ या कालावधीत पेठ-१८९३, नाशिक-१५३९०२, सिन्नर-४३०२५,दिंडोरी-४८३६७, सुरगाणा-२८७१२, त्र्यंबकेश्वर-२३४८८, निफाड-६०४३३, इगतपुरी-२७२५५, चांदवड-३२५३०, देवळा-१७०६०, नांदगाव-२८८३९, मालेगाव-९३४६२, बागलाण-३८२२०, येवला-३२००८, कळवण-२७०४४ असे एकूण ६,७२,५५८ इतके अर्ज प्राप्त झाले आहेत.
 


सम्बन्धित सामग्री