Saturday, September 07, 2024 05:21:33 PM

heavy rain in Neera valley
नीरा खोऱ्यात संततधार पाऊस

वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये होत असलेल्या संततधार पावसामुळे वीर धरणाच्या पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

नीरा खोऱ्यात संततधार पाऊस 
neera river

२४  जुलै,२०२३ बारामती : वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये होत असलेल्या संततधार पावसामुळे वीर धरणाच्या पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. वीर धरणात बुधवारी सकाळी ७० टक्के पाणीसाठा झाला आहे. वीर धरणाची ९ पूर्णांक ८१५ टीएमसी क्षमता असून ६ पूर्णांक ६२१ टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे. 
भोर आणि राजगड  तालुक्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे नीरा नदी प्रणालीमध्ये असलेल्या धरणांच्या पाणी साठ्यामध्ये मोठी वाढ झाली आहे. नीरा नदी प्रणालीमध्ये असलेल्या भाटघर, गुंजवणी आणि निरादेवघर या धरणांच्या पाणी साठ्यात देखील मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. यामुळे लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांसह नागरिक आनंदित झाला आहे.


सम्बन्धित सामग्री