Friday, November 22, 2024 02:01:28 AM

heavy rain in kokan
कोकणात पावसाचा जोर कायम

कोकणात पावसाचा जोर कायम आहे. मुसळधार पावसामुळे सिंधुदुर्ग, रत्नागिरी येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे.

कोकणात पावसाचा जोर कायम 
heavy rain kokan

१४ जुलै, २०२४ रत्नागिरी : कोकणात पावसाचा जोर कायम आहे. मुसळधार पावसामुळे सिंधुदुर्ग, रत्नागिरी येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. 

सिंधुदुर्गला सतर्कतेचा इशारा 

सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वत्र पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्हयात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.  जिल्हयात रात्री सावंतवाडी, कणकवली, कुडाळ, दोडामार्ग तालुक्यात मुसळधार पाऊस पडत होता. किनारपट्टी भागात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने जिल्हयात मुसळधार पाऊस बरसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

चिपळूण नजीक दुकानांमध्ये शिरले पाणी

मुंबई गोवा महामार्गावरील चिपळूण शहरानजीक असलेल्या ओझरवाडीच्या दुकानांमध्ये संततधार पावसामुळे पाणी शिरले आहे. यामुळे व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. ओझरवाडी येथील रस्त्याला नदीचे रूप आले आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिला तर चिपळूण शहर पाण्याखाली जाऊ शकते, अशी भीती जनसामान्यांतून व्यक्त होत आहे. 

मंडणगडमध्ये भातशेती पाण्याखाली 

रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड भिंगळोली एसटी डेपो ते शासकीय रेस्टहाऊव तसेच समर्थ अपार्मेट या ठिकाणी पुन्हा पुराचे पाणी घुसले आहे. यामुळे वाहन चालकांना कसरत करावी लागत आहे. रस्ता जलमय झाल्याने वाहन चालवणे कठीण झाले आहे. जिल्ह्यात शनिवारपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे भात शेती पाण्याखाली गेली आहे तर काही ठिकाणी रस्ते जलमय झाले आहेत. त्यामुळे वाहन चालवताना वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे.

खेडमध्ये 'जगबुडी'चे रौद्ररूप

रत्नागिरी तालुक्यातील खेडमधील जगबुडी नदीने रौद्ररूप धारण केले असून सकाळपासून नदी पाणी पात्राच्या वर वाहत आहे. खेडमध्ये जगबुडी नदी धोक्याच्या पातळीवर गेली आहे. नदीचे सर्व पाणी बाजारपेठेत व्यापारी संकुलांमध्ये आणि मानवी वस्तीत घुसल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. खेड मटण मार्केट परिसरात जगबुडी नदीचे पाणी शिरलेबी आहे. पावसाचा जोर वाढल्यास पुराचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे नगर परिषदकडून नागरिकांना खबरदारीच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 


सम्बन्धित सामग्री






jaimaharashtranews-logo