Wednesday, April 09, 2025 11:04:11 AM

सोन्याचे भाव आभाळाला टेकले,आता 85 हजारांवर जाण्याची शक्यता

अवघ्या 15 दिवसांत 78-79 हजार रुपये प्रति तोळा असलेलं सोनं आता 84 हजार रुपये प्रति तोळा या उच्चांकी स्तरावर पोहोचलं आहे.


सोन्याचे भाव आभाळाला टेकलेआता 85 हजारांवर जाण्याची शक्यता

मुंबईकरांसाठी मोठी बातमी! देशातील सर्वाधिक सोनं खरेदी-विक्री होणाऱ्या शहरांपैकी एक असलेल्या मुंबईत सोन्याच्या दरात मोठी उसळी पाहायला मिळत आहे. अवघ्या 15 दिवसांत 78-79 हजार रुपये प्रति तोळा असलेलं सोनं आता 84 हजार रुपये प्रति तोळा या उच्चांकी स्तरावर पोहोचलं आहे. एवढंच नाही, तर लवकरच सोन्याचा दर 85 हजारांच्या पुढे जाण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे. चांदीच्या किमतीतही लक्षणीय वाढ झाली असून, चांदीचा दर 94,500 रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे. या वाढलेल्या दरांवर 3% जीएसटी देखील लागू होत आहे, त्यामुळे सर्वसामान्य खरेदीदारांच्या खिशाला मोठा फटका बसत आहे.

विशेष म्हणजे, ही वाढ लग्नसराईच्या हंगामात झाली असल्याने अनेक जण बजेटपेक्षा जास्त खर्च करायला मजबूर होत आहेत. जागतिक बाजारातील चढ-उतार, चलनफुगवट्याचा प्रभाव आणि आर्थिक परिस्थिती यामुळे सोन्याच्या किमती झपाट्याने बदलत आहेत. सोन्याची किंमत वाढत असताना, अनेक गुंतवणूकदार आणि व्यापारी सावध पावले उचलत आहेत. सोनं खरेदी करण्यापूर्वी किंवा विक्री करण्यापूर्वी दराची सतत माहिती घेणं अत्यावश्यक ठरत आहे, अन्यथा आर्थिक तोटा होऊ शकतो.

जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.

तज्ज्ञांच्या मते, येत्या काही आठवड्यांत सोन्याचे दर 90 हजारांचा टप्पा ओलांडण्याची शक्यता आहे. त्यामुळे भविष्यात सोन्याच्या किमती अधिक वाढण्याची शक्यता लक्षात घेता, नागरिकांनी विचारपूर्वक खरेदी-विक्रीचे निर्णय घ्यावेत. सोन्यात गुंतवणूक करणाऱ्यांसाठी हा संधीचा काळ असला, तरी सामान्य खरेदीदारांसाठी मात्र वाढती महागाई डोकेदुखी ठरत आहे.

हेही वाचा:  मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! 5-6 फेब्रुवारीला पाणीपुरवठा बंद


सम्बन्धित सामग्री