Monday, May 12, 2025 06:49:48 PM

शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांना भारतरत्न द्या; खासदार राऊतांनी केली मागणी

शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न देण्याची मागणी ठाकरे गटाचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी केली आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांना भारतरत्न द्या खासदार राऊतांनी केली मागणी

मुंबई : शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न देण्याची मागणी ठाकरे गटाचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी केली आहे. बाळासाहेबांनी या देशात हिंदुत्त्वाचं बिज रोवलं आणि वाढवलं त्यांना अद्याप भारतरत्न का दिलं नाही? असा सवाल राऊत यांनी व्यक्त केलाय. बाळासाहेबांचं जन्मशताब्दी वर्ष सुरू होणार आहे, त्याआधी त्यांना भारतरत्न देणं गरजेचं आहे. हे वीर सावरकरांना देखील भारतरत्न देऊ शकले नाहीत. त्यामुळे बाळासाहेबांना भारतरत्न दिलात तर तो सावरकरांचाही गौरव ठरेल", असा टोला राऊत यांनी लगावला आहे. 

शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती आहे. यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि  केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह भाजपाच्या अनेक नेत्यांनी त्यांना पोस्टद्वारे आदरांजली वाहिलीय.

जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी  व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.

मोदी यांची आदरांजली 

बाळासाहेब ठाकरे यांना त्यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन
धाडसी आणि दुर्दम्य बाळासाहेबांनी नेहमीच जनतेच्या कल्याणाचे मुद्दे मांडले
भारतीय नैतिकता आणि मुल्यांविषयी त्यांनी नेहमीच अभिमान वाटत राहिला
 ते नेहमीच लाखो लोकांना प्रोत्साहित करत राहतील

हेही वाचा : भाजपाकडून सरकारी कामांसाठी नवा पायंडा

शाह यांची आदरांजली 

बाळासाहेब ठाकरे हे त्यांच्या काळातील एक बुद्धीमान नेते होते
 त्यांनी नेहमीच आपल्या वक्तृत्व कौशल्यांनं जनतेला मंत्रमुग्ध केलं
 ते ता आपल्या भूमिकांवर ठाम राहिले
 त्यांनी त्यांच्या विचारधारेशी, आदर्शांशी कधीही तडजोड केली नाही
 बाळासाहेबांचं जीवन आणि त्यांची मूल्ये आपल्याला कायम प्रेरणा देत राहतील
अमित शाह, केंद्रीय मंत्री


आत्तापर्यंत विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी भारतरत्न सर्वोच्च पुरस्काराने गौरवण्यात आलंय.

भारतरत्न पुरस्कारार्थींची नावे
1954    - सी. राजगोपालाचारी , सर्वपल्ली राधाकृष्णन, सीव्ही रमण    
1955  - भगवान दास, एम. विश्वेश्वरय्या, जवाहरलाल नेहरू
1957 -  गोविंद बल्लभ पंत, 1958 धोंडो केशव कर्वे
1961 - बिधान चंद्र रॉय, पुरुषोत्तम दास टंडन, 1962- राजेंद्र प्रसाद, 1966 - लाल बहादूर शास्त्री, 1971 - इंदिरा गांधी
1983 - विनोबा भावे, 1991- राजीव गांधी, 2001- लता मंगेशकर, बिस्मिल्ला खान    
2009 - भीमसेन जोशी,  2014 - सचिन तेंडुलकर , 2015 - मदन मोहन मालवीय    , अटलबिहारी वाजपेयी
2019- प्रणव मुखर्जी, नानाजी देशमुख, 2024- कर्पूरी ठाकूर, लालकृष्ण अडवाणी, पीव्ही नरसिंह राव अशा दिग्गज लोकांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. 

बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न देण्याची मागणी ठाकरे गटाने केली आहे. त्याच्या विचारांचा वारसा घेवून सत्तेत सहभागी असणाऱ्या एकनाथ शिंदे यांनी या मागणीचा पाठपुरावा करावा अशी शिवसैनिकांची इच्छा आहे. 


सम्बन्धित सामग्री