Monday, September 16, 2024 06:40:14 PM

dhananjay mahadik demand
'लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न द्या'

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना केंद्र सरकारने भारतरत्न पुरस्कार द्यावा, अशी मागणी खासदार धनंजय महाडिक यांनी राज्यसभेत केली.

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न द्या
annabhau sathe

५ ऑगस्ट, २०२४, कोल्हापूर : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना केंद्र सरकारने भारतरत्न पुरस्कार द्यावा, अशी मागणी खासदार धनंजय महाडिक यांनी राज्यसभेत केली. अण्णाभाऊ साठे यांनी समाजातील शोषित आणि दुर्लक्षित वर्गासाठी आपल्या लेखणीतून आवाज उठवला आणि सामाजिक न्यायाची चळवळ मजबुत केली. अण्णाभाऊ साठे यांचे केवळ साहित्यीक योगदान नसुन, सामाजिक परिवर्तनामध्ये त्यांनी मोठी कामगिरी केली आहे. त्यामुळेच त्यांना भारतरत्न सारख्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करावे, अशी आग्रही मागणी खासदार महाडिक यांनी केली.
राज्यसभेत बोलताना सोमवारी खासदार धनंजय महाडिक यांनी, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी केली. अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यीक आणि सामाजिक परिवर्तनाच्या क्षेत्रातील कामागिरीची माहिती खासदार महाडिक यांनी राज्यसभेत बोलताना दिली. अण्णाभाऊ साठे यांनी ३५ कादंबर्‍या, १० लोकनाट्य, २४ लघुकथा, १० पोवाडे, एक नाटक आणि प्रवास वर्णन लिहिले आहे. बालविवाह आणि हुंडा प्रथेला विरोध, अंधश्रध्दा निर्मुलन, जातीय भेदभाव, श्रमिकांचा संघर्ष याबाबत त्यांनी आपल्या लेखणीतून आवाज उठवला. त्यांच्या साहित्याचा रशियन, जर्मन, पॉलिश भाषेत अनुवाद झाला आहे. तर, महिला, दलित, शोषित, पिडीत यांच्या उध्दारासाठी त्यांनी प्रयत्न केले आहेत. अण्णाभाऊ साठे यांचे समाज परिवर्तनासाठी केवळ साहित्यीक योगदान नाही तर, सामाजिक स्तरावरही त्यांनी मोठी कामगिरी केली आहे, असे खासदार महाडिक यांनी राज्यसभेत बोलताना नमुद केले. त्यामुळेच साहित्यरत्न, महाराष्ट्र भूषण आणि लोकशाहीर अशी उपाधी मिळालेल्या अण्णाभाऊ साठे यांना केंद्र सरकारने भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सत्कार बहाल करावा, अशी मागणी खासदार धनंजय महाडिक यांनी केली.


सम्बन्धित सामग्री