पालघर : गावरान आंब्याच्या झाडांमध्ये झालेली घट आणि मागील काही वर्षांपासून बदलत्या हवामानाचा फटका बसल्याने उत्पादन कमी येत असल्याने बाजारात गावरान आंबा खूपच कमी प्रमाणात येतो. त्या मानाने स्थानिक तसेच अन्य ठिकाणांहून कलमी आंबा मोठ्या प्रमाणावर येत असल्याने गावरान आंब्याला खवय्यांकडून विचारणा होऊ लागली आहे, परंतु मागणीच्या तुलनेत उपलब्धता कमी असल्याचे चित्र शहाराप्रमाणे ग्रामीण भागातही दिसते.