Wednesday, February 05, 2025 11:38:20 AM

Manoj Jarange
25 जानेवारीपासून जरांगे पुन्हा उपोषणाला

मराठा आंदोलक मनोज जरांगे यांची तब्येत अचानक बिघडली आहे.

25 जानेवारीपासून जरांगे पुन्हा उपोषणाला

छत्रपती संभाजीनगर : मराठा आंदोलक मनोज जरांगे यांची तब्येत अचानक बिघडली आहे. अशक्तपणा आल्याने त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे आज जालना येथे झालेल्या मोर्चात ते हजर होऊ शकले नाहीत. आज जालन्यात सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले. 

जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी  व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.

 

बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्येच्या निषेधार्थ राज्यात विविध ठिकाणी मोर्चे काढण्यात येत आहेत. या प्रत्येक मोर्चात शनिवारी धाराशिव येथे देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात मनोज जरांगे सहभागी होणार असल्याचे त्यांनी सांगितले. आज जालन्यात झालेल्या मोर्चात जरांगे सहभागी झाले होते. मात्र त्यांचे भाषण होऊ शकले नाही. कारण त्यांची तब्येत ठिक नाही. जालनातील मोर्चा झाल्यानंतर लगेच जरांगे पाटील यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले. संभाजीनगरच्या गॅलेक्सी रूग्णालयात जरांगेवर उपचार सुरू आहेत. 

हेही वाचा : जालन्यातील जनआक्रोश मोर्चातील आयोजकांना नोटीस
 

मनोज जरांगे 25 जानेवारीपासून उपोषणाला बसणार 

मनोज जरांगे यांनी 25 जानेवारीला उपोषणाला बसणार असल्याची घोषणा केली आहे. आंतरवाली सराटी येथून जरांगे उपोषणाला सुरूवात करणार आहेत. सामूहिक आमरण उपोषण करणार आहेत. ज्यांना स्वच्छेने उपोषणात सहभागी व्हायचे आहे. त्यांनी या उपोषणात सहभागी व्हावे. कोणालाही आमरण उपोषणात सहभागी होण्याची जबरदस्ती नसल्याचे मनोज जरांगे यांनी स्पष्ट केले. परंतु त्याआधीच जरांगे यांची तब्येत बिघडल्याने त्यांना गॅलेक्सी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. 


सम्बन्धित सामग्री