Thursday, September 19, 2024 03:04:33 PM

=Keshavrao Bhosle theatre updates
केशवराव भोसले नाट्यगृहाची फॉरेन्सिक तपासणी

केशवराव भोसले नाट्यगृहाची फॉरेन्सिक विभागाकडून तपासणी करण्यात आली आहे. फॉरेन्सिक विभागाचे कर्मचारी अधिकारी यांच्याकडून घटनास्थळाची पाहणी करण्यात आली.

केशवराव भोसले नाट्यगृहाची फॉरेन्सिक तपासणी
keshvrao bhosale natyagruh

१० ऑगस्ट, २०२४, कोल्हापूर : केशवराव भोसले नाट्यगृहाची फॉरेन्सिक विभागाकडून तपासणी करण्यात आली आहे. फॉरेन्सिक विभागाचे कर्मचारी अधिकारी यांच्याकडून घटनास्थळाची पाहणी करण्यात आली. केशवराव भोसले नाट्यगृह तसेच खासबाग मैदान येथील जळून खाक झालेल्या रंगमंचाची फॉरेन्सिक विभागाकडून पाहणी करण्यात आली. फॉरेन्सिक विभागाकडून नाट्यगृह येथील जळालेले काही नमुने फॉरेन्सिक विभागाकडून घेण्यात आले. 
गुरुवारी, ८ ऑगस्ट, २०२४ रोजी कोल्हापूर शहरामध्ये  भीषण अग्नितांडव पाहायला मिळाले. या आगीत ऐतिहासिक संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृह जळून खाक झाले. या नाट्यगृहाला शंभर वर्षांपूर्वीची परंपरा आहे. राजाराम महाराज यांनी करवीर संस्थांमधील कलाकारांसाठी एक व्यासपीठ म्हणून पॅलेस थेटरची निर्मिती केली होती. नंतर त्याचे रूपांतर संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहात झाले होते. 


सम्बन्धित सामग्री