Monday, September 09, 2024 09:54:24 PM

flood at pravara river
प्रवरा नदीकाठी पूरसदृश परिस्थिती

अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा आणि निळवंडे धरणातून प्रवरा नदीत मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. प्रवरा नदीला पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे.

प्रवरा नदीकाठी पूरसदृश परिस्थिती
pravara river

४ ऑगस्ट, २०२४, अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा आणि निळवंडे धरणातून प्रवरा नदीत मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. प्रवरा नदीला पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे अकोले तालुक्यातील मेहंदुरी गावातील शेतात नदीचे पाणी शिरले आहे. येथील शेतात भात, सोयाबीन आणि ऊस या पिकांचे नुकसान झाले आहे. प्रवरा नदीतून पाण्याचा जायकवाडी धरणाच्या दिशेने प्रवास सुरू आहे. यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.


सम्बन्धित सामग्री