सांगली : सांगली जिल्ह्यातील गणेश तालावातील मासे मृत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. मासे मृत झाल्याने दलित महासंघाकडून आंदोलन करण्यात आले आहे. दलित महासंघाने महानगरपालिकेच्या बाहेर आंदोलन केले आहे.
हेही वाचा : Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी; डिसेंबरच्या ‘या’ तारखेला खात्यात जमा होणार पैसे
गणेश तलावात मासे मृत झाल्यामुळे संतप्त झालेल्या दलित महासंघाने आज महापालिकेवर उलटा मासे आंदोलन केले आहे. मिरजेतील गणेश तलावात मासे मृत झाल्यामुळे संतप्त झालेल्या दलित महासंघाने आज महापालिकेवर उलटा मासे आंदोलन करत प्रशासनावर निषेध व्यक्त केला आहे. दलित महासंघाचे अध्यक्ष उत्तम मोहिते यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. मिरजेच्या गणेश तलावातील पाणी प्रदूषणामुळे हजारो मासे मृत झाले होते. या प्रकरणी संबंधितांवर कारवाई व्हावी अशी मागणी दलित महासंघाने केली आहे.
जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.
कारवाईची मागणी करत दलित महासंघाने आज सांगली महापालिकेवर उलटा मासा आंदोलन करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी हातात उलटा मासा पकडत महापालिकेसमोर निदर्शने केली. तसेच मृत मासे महापालिकेच्या स्वाधीन करत कारवाईची मागणी केली.