Fire At Residential Building In Kondhwa
Edited Image
Fire At Residential Building In Kondhwa: पुणे शहरातून मोठी बातमी समोर येत आहे. कोंढवा येथील एनआयबीएम रोडवरील एका निवासी इमारतीला भीषण आग लागली आहे. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आग विझवण्यात आली असून या आगीत एका महिलेचा मृत्यू झाला आहे. तसेच दुसरी महिला गंभीर जखमी झाली आहे. जखमी महिलेवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
हेही वाचा - मालमत्तेवरून वाद विकोपाला गेला! नातवाने उद्योगपती आजोबावर 73 वेळा चाकूने वार करून केली हत्या
पुणे अग्निशमन दलाने या घटनेबाबत एक निवेदन जारी केले आहे. या निवेदनात त्यांनी म्हटलं आहे की, 'पुण्यातील कोंढवा येथील एनआयबीएम रोडवरील एका निवासी इमारतीत लागलेल्या आगीत एका महिलेचा मृत्यू झाला आहे. आग विझवण्यात आली असून एका जखमी महिलेवर उपचार सुरू आहेत.
हेही वाचा - आईकडून दोन मुलांची गळा दाबून हत्या; नेमकं घडलं काय?
ठाण्यातील हायपरसिटी मॉलमध्ये आग -
जानेवारी महिन्यात ठाणे जिल्ह्यातील घोडबंदर रोड कॉम्प्लेक्समध्ये असलेल्या हायपरसिटी मॉलमध्ये अचानक आग लागली. सकाळी 7:50 वाजता मॉलच्या दुसऱ्या मजल्यावर असलेल्या पुमा ब्रँड आउटलेटमध्ये अचानक आग लागली. सुदैवाने, ही घटना सकाळी घडली. त्यामुळे मॉलमध्ये कोणतेही ग्राहक उपस्थित नव्हते, त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.