Monday, September 09, 2024 03:21:27 PM

Extension to submit cast certificate
मुख्यमंत्र्यांचा निर्णय, विद्यार्थ्यांना दिलासा

विद्यार्थ्यांना जातवैधता प्रमाणपत्र सादर करणासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदेंकडून विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

मुख्यमंत्र्यांचा निर्णय विद्यार्थ्यांना दिलासा 
eknath shinde

२२ जुलै, २०२४ मुंबई : विद्यार्थ्यांना जातवैधता प्रमाणपत्र सादर करणासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदेंकडून विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. विद्यार्थ्यांना सहा महिन्याची मुदतवाढ देण्यात आली आहे. शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून हा निर्णय लागू होणार आहे. 

वैद्यकीय आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांना आणि विविध शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थांना ही मुदतवाढ देण्यात आली आहे. जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी अर्ज केल्याच्या दिनांकापासून ते सहा महिन्यांच्या कालावधीपर्यंत मुदत वाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता विशेषत: मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र मिळण्यात होणाऱ्या अडचणीही दूर होणार आहेत.

विद्यापीठ परीक्षांच्या निकालानंतर विद्यार्थ्यांची नवीन वर्गातील प्रवेशासाठी धावपळ सुरू आहे. आरक्षणाच्या माध्यमातून प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र सादर करावे लागते. त्यामुळे, मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. 


सम्बन्धित सामग्री