Thursday, September 12, 2024 05:28:35 PM

end of gurupaurnima celebrations
तीन दिवसीय गुरुपौर्णिमा उत्सवाची सांगता

शिर्डीच्या साईमंदिरात सुरू असलेल्या तीन दिवसीय गुरु पौर्णिमा उत्सावाची सोमवारी सांगता झाली. शिर्डीच्या समाधी मंदिरात दहीहंडी फोडत गुरुपौर्णिमा उत्सवाची सांगता करण्यात आली.

तीन दिवसीय गुरुपौर्णिमा उत्सवाची सांगता

२२ जुलै, २०२४ शिर्डी : शिर्डीच्या साईमंदिरात सुरू असलेल्या तीन दिवसीय गुरु पौर्णिमा उत्सावाची सोमवारी सांगता झाली. शिर्डीच्या समाधी मंदिरात दहीहंडी फोडत गुरुपौर्णिमा उत्सवाची सांगता करण्यात आली. गुरुपौर्णिमा उत्सवा दरम्यान, लाखो साईभक्तांनी दर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती. या उत्सवादरम्यान दरवर्षीप्रमाणे साईमंदिरात संस्थानाच्यावतीने विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. 

साईबाबांच्या हयातीपासून सुरू झालेल्या गुरु पौर्णिमा उत्सवाला मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी हजेरी लावत असतात. शनिवारी सुरू झालेल्या उत्सवाची सोमवारी समाधी मंदिरात दहीहंडी फोडून सांगता करण्यात आली. गेल्या तीन दिवसात जवळपास चार लाख भाविकांनी साईदर्शनाला हजेरी लावली आहे. सोमवारी साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्षनाथ गाडीलकर यांच्या हस्ते पादुकापूजन, साईचरित्र पठण करण्यात आले. त्यानंतर दहीहंडी फोडण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने साईभक्त आणि गावकरी सहभागी झाले होते.


सम्बन्धित सामग्री