Tuesday, September 17, 2024 08:56:35 AM

Dr. Udaysingh Peshwa Passes Away
डॉ. उदयसिंह पेशवा यांचे निधन

निधनामुळे महाराष्ट्रातील शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात मोठा शोक व्यक्त केला जात आहे.

डॉ उदयसिंह पेशवा यांचे निधन
डॉ. उदयसिंह पेशवा
डॉ. उदयसिंह पेशवा

पुणे - पेशवा घराण्याचे नववे वंशज आणि श्री देवदेवेश्वर संस्थानचे ज्येष्ठ विश्वस्त डॉ. विनायक विश्वनाथ उर्फ उदयसिंह पेशवा (वय ८६) यांचे बुधवारी सायंकाळी वृद्धापकळाने निधन झाले. वैकुंठ स्मशानभूमीमध्ये रात्री उशीरा त्यांच्या पार्थिवावर अत्यंसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मागे पत्नी जयमंगलाराजे पेशवा, एक मुलगा आणि दोन मुली असा परिवार आहे.

उदयसिंह पेशवा हे पेशव्यांचे नववे वंशज होते आणि गेल्या ५७ वर्षांपासून श्री देवदेवेश्वर संस्थानचे विश्वस्त होते. त्यांनी हॉलंडमधून भूगर्भशास्त्रात उच्चशिक्षण पूर्ण केले आणि पीएचडी केल्यानंतर पुण्यात आले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये भूगर्भशास्त्र विभागाचे प्रमुख म्हणून त्यांनी अनेक वर्ष काम केले. भूगर्भशास्त्र, भूजलसाठ्याचा अभ्यास, संशोधन आणि नवनवीन घडामोडींचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी भारत भ्रमण केले.

त्यांच्या संशोधनामध्ये महत्त्वपूर्ण योगदान होतं. शैक्षणिक आणि संशोधन क्षेत्रात त्यांनी केलेल्या कार्याबरोबरच, श्री देवदेवेश्वर संस्थांच्या व्यवस्थापनात त्यांनी सक्रीय सहभाग घेतला. पेशवा घराण्याचा नावलौकिक जपण्यासाठी त्यांनी आयुष्यभर उल्लेखनीय कार्य केले. त्यांच्या निधनामुळे महाराष्ट्रातील शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात मोठा शोक व्यक्त केला जात आहे.


सम्बन्धित सामग्री