Saturday, September 28, 2024 10:53:25 PM

DIWALI TRIAN TICKETS ARE FULL
दिवाळीत गावी जाण्यासाठी तिकीट मिळेना

सर्वाधिक सोयीस्कर प्रवास म्हणून रेल्वे प्रवासाकडे पाहिले जाते. मात्र, ऐन सणासुदीच्या काळात चाकरमान्यांना रेल्वेचे तिकीट मिळत नसल्याने बहुतेकदा गैरसोय होत आहे.

दिवाळीत गावी जाण्यासाठी तिकीट मिळेना 

२८ सप्टेंबर, २०२४, मुंबई : सर्वाधिक सोयीस्कर प्रवास म्हणून रेल्वे प्रवासाकडे पाहिले जाते. मात्र, ऐन सणासुदीच्या काळात चाकरमान्यांना रेल्वेचे तिकीट मिळत नसल्याने बहुतेकदा गैरसोय होत आहे. याचीच प्रचिती दिवाळीच्या पार्श्वभूमीवर आली आहे. १ नोव्हेंबरपासून दिवाळी सुरु होत आहे. दिवाळीसाठी आपल्या मूळ गावी जाणाऱ्या चाकरमान्यांना रेल्वेच्या तिकिटं मिळत नाही आहेत. दिवाळीच्या आठवड्याभरापूर्वीच्या गाड्यांचे आरक्षण पूर्ण झाले असून, बहुतांश गाड्या प्रतीक्षा यादीत गेल्या आहेत. परिणामी चाकरमान्यांमध्ये नाराजीचा सूर पसरला आहे. त्यासाठी दिवाळीसाठी विशेष गाड्या सोडाव्यात, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.


सम्बन्धित सामग्री