Tuesday, July 02, 2024 08:42:46 AM

Dhangekar revealed the malpractice of the police
धंगेकरांनी केला पोलिस स्टेशनचा गैरप्रकार उघड

काँग्रेस नेते रविंद्र धंगेकर यांनी एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. या पोस्टमध्ये धंगेकरांनी पुण्यातील पोलिसांनी केलेला गैरप्रकार उघड केला आहे.


धंगेकरांनी केला पोलिस स्टेशनचा गैरप्रकार उघड

मुंबई : काँग्रेस नेते रविंद्र धंगेकर यांनी एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. या पोस्टमध्ये धंगेकरांनी पुण्यातील पोलिसांनी केलेला गैरप्रकार उघड केला आहे.धंगेकर यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना  एक गोष्ट लक्षात आणून देऊ इच्छितो, कल्याणीनगर अपघातानंतर तपासात अक्षम्य चुका होऊन देखील पुणे शहराचे पोलीस कमिश्नर अमितेश कुमार यांना अजूनही कोणी दोषी आहेत असे वाटत नाही. अर्थात जो स्वतःच बिल्डरच्या पाकिटावर काम करतोय तो कसा कुणावर कारवाई करणार...? असा प्रश्न त्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केला आहे.  

पुढे धंगेकर म्हणाले आजपासून मी तुम्हाला दररोज एका पोलिस स्टेशनवर सुरू असलेल्या गैर-कारभाराची कथा पाठवणार आहे आणि त्यांनी मुंढवा पोलिस स्टेशनमध्ये चालणारा धक्कादायक प्रकार सांगितला. 
मुंढवा येथील पोलीस स्टेशन अवघे ३ कर्मचारी चालवतात.त्यापैकी निलेश पालवे ,काळे हे कॉन्स्टेबल सर्व पब्स, हॉटेल येथून हप्ते गोळा करण्याचे काम करतात असे धंगेकरांनी सांगितले. या पोस्टसह एक फोटो त्यांनी पोस्ट केला आहे. ज्यात वसुली हवालदार वॉटर्स नावाच्या पबमध्ये पार्टी करताना दिसून येत आहे. 

आम्हा पुणेकरांच्या वतीने आपणांस विनंती आहे की,पुणे बिघडविणाऱ्या या पोलीस हवालदाराची तातडीने चौकशी करत त्याचे निलंबित करा,अन्यथा ४८ तासात यांचे इतर व्हिडिओ देखील असेच ट्विट करण्यात येतील असे रवींद्र धंगेकर यांनी पोस्टच्या माध्यमातून त्यांनी सांगितले आहे. धंगेकर यांनी सोशल मीडियावर टाकलेल्या पोस्टच्या माध्यमातून पुण्यात चालणाऱ्या अवैध कामांवर लक्ष देण्याची विनंती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली आहे. 


सम्बन्धित सामग्री