Friday, April 04, 2025 03:10:49 PM

धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत आमदार सुरेश धस यांनी केला खळबळजनक खुलासा

आमदार सुरेश धस नाशिक दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली नाही असे माध्यमांना सांगितले आहे.

धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत आमदार सुरेश धस यांनी केला खळबळजनक खुलासा

नाशिक : बीडच्या आष्टी मतदारसंघाचे भाजपा आमदार सुरेश धस यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणात सातत्याने आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत. संतोष देशमुख यांच्या हत्या करणाऱ्या गजाआड करून शिक्षा देण्याची मागणी वारंवार त्यांनी केली आहे. आज सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला 2 महिने पूर्ण झाले. तरीही देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे फरार आहे. अद्याप त्याला पकडण्यात पोलिसांना यश मिळालेले नाही. आमदार सुरेश धस नाशिक दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली नाही असे माध्यमांना सांगितले आहे.  

मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर काही दिवसांपासून टीकेची झोड उठवली जात आहे. सातत्याने देशमुख प्रकरणात त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. यावर आता धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली नाही. धनंजय मुंडेंचा त्यांच्याच पक्षातील नेते राजीनामा मागत आहेत, मी त्यांचा राजीनामा मागितलेला नाही असा खुलासा आमदार सुरेश धस यांनी केला आहे. 

हेही वाचा : जरांगेंच्या मेहुण्यावर तडीपारीची कारवाई; कोण आहे जरांगेंचा मेहुणा?
 

आरोपी कृष्णा आंधळे यांच्या कुटुंबीय आणि पोलिसांकडून माहिती घेतली. कृष्णा आंधळे हा संभाजीनगर येथे पोलीस बनण्याची तयारी करत होता. पोलिसाची तयारी करता करता तो गुन्हेगार बनला. गुन्हेगार बनल्यानंतर सायको झाला. बऱ्याच गुन्ह्यांमध्ये तो सतत फरार आहे. मला वाटतं तो राज्याच्या बाहेर असावा. बकरी की माँ कब तक दुवा मागेगी कोकरू बाळ आहे पकडले जाईल असे सुरेश धस यांनी म्हटले आहे. 

पुढे बोलताना धस म्हणाले, विष्णू चाटे हा नाशिकमध्ये आला होता. दहा तारखेनंतर त्याने त्याचा मोबाईल फेकून दिला आणि नंतर सरेंडर झाला. मोबाईल फेकला म्हणजे तपासात अडथळा येईल असे काही नाही. कंपनीला सांगून त्याचा डाटा रिकव्हर केलेला आहे असे धस यांनी सांगितले आहे. 

हेही वाचा : Mexico Bus Accident: मेक्सिकोमधील टॅबास्कोमध्ये भीषण बस अपघात; 40 जणांचा मृत्यू
 

अंजली दमानीया काय म्हणाल्या करुणा शर्मा काय म्हणायला यापेक्षा त्यांच्याच पक्षातील लोक म्हणताय त्यांनी राजीनामा द्यावा ज्येष्ठ नेते प्रकाश सोळंके यांनी देखील मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.मी स्वतः त्यांचा राजीनामा मागितलेला नाही. तपासामध्ये आकापर्यंत एसआयटी पोहोचली आहे. आकाच्या पुढे गेल्यानंतर बघू. असं काही होईल मला वाटत नाही. त्यांचा राजीनामा घ्यावा की नाही घ्यावा हा सगळा निर्णय अजित पवार, प्रफुल पटेल आणि त्यांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्षांच्या हातात आहे. त्यांनी मनात आणले तर त्यांचा राजीनामा तातडीने घेतला जाईल. 


सम्बन्धित सामग्री