पैठण : पैठण तालुक्यातील सोलनापूर येथे शेतकऱ्याकडून कापूस खरेदी करणाऱ्या दोन व्यापाऱ्यांनी रिमोट कंट्रोलवर मापात पाप करून १ लाख ५ हजार रुपयांची फसवणूक केली. यामुळे आता परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. सध्या शेतकरी कापूस विक्रीसाठी सक्रिय आहे. यामुळे व्यापाऱ्यांकडून मापात पाप करून शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक करण्याचा प्रकार घडत आहे.
तालुक्यातील सोलनापूर येथील शंकर शिवाजी नाटकर यांनी शंकर रामनाथ गोर्डे यांच्या मध्यस्थीने ७ हजार भाव ठरवून इलेक्ट्रॉनिक काट्यावर वजन करून शंकर शिवाजी नाटकर ९.५० क्विंटल यांचा कापूस व्यापाऱ्याच्या वजन काट्यावर ६.५० भरला. तसेच यासह अय्युब इस्माईल शेख ८.५० व्यापाऱ्याच्या काट्यावर ७ विवंटल, विष्णू अण्णासाहेब नाटकर १९.५० असताना १४.५० भरला, विठ्ठल पांडुरंग खरात ३४ क्विंटल २८ भरला, गोरख लांडे या व्यापाऱ्यांनी त्यांच्या काट्यावर वजनानुसार या शेतकऱ्यांना ठरलेल्या भावाप्रमाणे रक्कम अदा केली. याप्रकरणी पोलिस निरक्षक संजय देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पैठण पोलिस ठाण्यात या दोन्ही व्यापाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या व्यापाऱ्यांनी आणखी किती शेतकऱ्यांच्या मापात पाप केले हे चौकशी झाल्यावर स्पष्ट होणार आहे.